निवारा वृद्धाश्रमात २२० वृद्धांची मोफत आरोग्य तपासणी

रिता मुखर्जी वेलनेस मेमोरियल हेल्थ सेंटर यांच्या वतीने शिबिराचे आयोजन
पुणे : रिता मुखर्जी वेलनेस मेमोरियल हेल्थ सेंटर यांच्यावतीने निवारा वृद्धाश्रमात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वृद्धाश्रमातील २२० वयोवृद्ध नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

रक्त तपासणी, हिमोग्लोबीन, कोलेस्ट्रॉल, यूरिन, किडनी फंक्शन, लिवर फंक्शन, एक्स-रे, ईसीजी या तपासण्या करण्यात आल्या. डॉ. आकांक्षा गोसावी, डॉ.सुरज काटे, डॉ. स्नेहल बडजात्ये यांनी सहभाग घेतला. निवारा वृद्धाश्रमाचे विश्वस्त रवींद्र मराठे यांनी या शिबिरासाठी सहकार्य केले.

डॉ. आकांक्षा गोसावी म्हणाल्या, निवारा वृद्धाश्रमात अनेक वयोवृद्ध नागरिक राहत असतात. त्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: