पाणी प्रश्नावरून गिरीश बापट यांनी राजीनामा द्यावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी

पुणे: पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी काल आयुक्त विक्रमकुमार यांची भेट पुण्यातील पाणी प्रश्नाबाबत भेट घेतली. नंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले. पुणे शहराचा पाणीपुरवठा दोन-तीन दिवसात सुरळीत होईल असा विश्वास मला विक्रम कुमार यांनी दिला आहे .असे गिरीश बापट यांनी सांगितले.
तरी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील संघातील वडारवाडी,गुंजाळवाडी,पांडवनगर,गोखलेनगर, जनवाडी, वैदुवाडी, जनता वसाहत, शिवाजीनगर गावठान,आपटे रोड, भंडारकर रोड, पाटील इस्टेट, मुळारोड, औध, बोपोडी, खडकी, न.ता.वाडी, यशदा आनंद,चाफेकर नगर, मॉडेल कॉलनी,पूरग्रस्त वसाहत या भागामध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे तर काही ठिकाणी पाणीच येत नाही . या भागात पाणी लवकर सुरळीत व्हावे या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पुणे महानगरपालिकेच्या बाहेर आंदोलन केले.

या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.
या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर प्रवक्ते प्रदीप देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती अध्यक्षा सीमा सातपुते, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ ,पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशांत जगताप म्हणाले, पुण्याचे खासदार गिरीश बापट हे नुसते फसवणूक करत आहेत. पुण्याला पाणी नक्की कधी भेटणार हे लवकरात लवकर सांगावे. आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनातून करत आहोत. खासदार गिरीश बापट यांनी शिवाजीनगर मतदार संघातील ज्या ज्या भागात पाणी लवकर येत नाही तो लवकरच सुरळीत करावा. यासाठी आज आम्ही आंदोलन करत आहोत असे प्रशांत जगताप म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: