सीएसआर चित्रपट महोत्सवामुळे चांगल्या कामांना मिळेल प्रेरणा – डॉ. के एच. संचेती

पुणे  : ” देशात आज अनेक औद्योगिक कंपन्या, सामाजिक संस्था या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत (सीएसआर) अतिशय चांगले काम करतात. चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून त्यांचे काम समाजासमोर आणण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध होते. अशा प्रकारचे महोत्सव इतर शहरातही आयोजित केल्यास चांगल्या कामांसाठी नक्कीच प्रोत्साहन मिळेल,” असे मत संचेती रुग्णालयाचे संस्थापक संचालक आणि ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ पदमविभूषण डॉ. के एच. संचेती यांनी व्यक्त केले.
 सोशिओ कॉर्पो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तर्फे आयोजित भारतातील पहिल्या ‘सोशिओ सीएसआर फिल्म फेस्टिव्हल’च्या पुरस्कार वितरण समारोहप्रसंगी डॉ.संचेती बोलत होते. महोत्सवात पर्यावरण, आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध विषयांवर आधारित तब्बल 29 लघु चित्रपटाचे सादरीकरण करण्यात आले. तसेच काही निवडक चित्रपटांना डॉ. संचेती यांच्या हस्ते 19 चित्रपटांना ‘उत्कृष्ट चित्रपट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सरस्वती मेहता, संचालक , सोशिओ कॉर्पो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ऍड चेतन गांधी, संचालक , सोशिओ कॉर्पो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सतीश कोंढाळकर, संचालक , फ्लेअर नेटवर्क सिस्टम हे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना ऍड चेतन गांधी म्हणाले,” अनेक कंपन्या हे सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत समाजसाठी खुप चांगले कार्य करत आहेत, ते समाजापुढे आणणे आवश्यक आहे. समाजासाठी चांगले कार्य करणाऱ्या अशा कॉर्पोरेट कंपन्या आणि व्यक्ती यांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्या कामाला समाजापुढे आणणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.”
  याप्रसंगी 19 चित्रपटांना उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला. हे चित्रपट पुढीलप्रमाणे :
– पोल्ट्री लिटर मॅनेजमेंट (पर्यावरण )
 – वल्चर ऑफ ललीतपुर ( स्पेशल ज्युरी मेशन-पर्यावरण )
– परवाज ( स्पेशल ज्युरी मेंशन- कौशल्य विकास)
– सुधा पेपरबॅग प्रोजेक्ट् ( कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रकल्प)
– अपनी सखी-वी द ह्यूमन (मानवाधिकार)
– महाखादी (कौशल्य विकास)
– पनाह (सामाजिक)
– जलतरंग-डायव्हर्ट येट युनायटेड (ट्रान्सफॉर्मेशन फिल्म)
– झीरो वेस्ट कॅम्पस (स्पेशल ज्युरी मेंशन – पर्यावरण)
– ब्रा ( आरोग्य जागृती)
– मिशन इम्पॉसीबील(आरोग्य जागृती)
– बॅक टू स्कूल ( शैक्षणिक जागरूता – ऍनिमेशन चित्रपट)
– खिडकी ( सोशल कम्युनिटी प्रोजेक्ट) – ट्रान्सफार्मिंग रूरल इंडिया (मुलींचे शिक्षण)
– अनोखा धागा (महिला सक्षमीकरण)
– आयुषी (सामाजिक)
– हकदर्शक (महिला सक्षमीकरण )
– करन्सी (सामाजिक)
– या ब्रीज ऑफ लाईफ फॉर एज्युकेशन ( शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट सामाजिक बांधीलकी प्रकल्प)
हा महोत्सव चितळे बंधू मिठाईवाले, आदिनाथ ऍग्रो फूड्स प्रा. लि, फ्लेअर नेटवर्क सिस्टम्स प्रा. लि., एअरटेक अभियांत्रिकी आणि समाधान प्रा. लि, नोजल एक्सप्रेस आणि सिलिकॉन इन्फोटेक यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आला होता.

Leave a Reply

%d bloggers like this: