पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना कॉँग्रेस, राष्ट्रवादीचे निवेदन

पुणे : शहरात दिवसेंदिवस लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारांमधे वाढ होत आहे त्यासाठी पोलिस व नागरिक संवाद वाढणे गरजेचे आहे पोलिस स्टेशनमध्ये पोलिस पथक एरीयामधे गस्त घालणे जरुरीचे आहे याबाबत पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा संगिता तिवारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या ऍड रुपाली ठोंबरे पाटील यांनी संयुक्तपणे निवेदन दिले आणि या गुन्हेगारांवर अतिशय कठोर कारवाई करण्यात झाली पाहिजे ही मागणी करण्यात आली
यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा श्रीमती संगिता तिवारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या ऍड रुपाली ठोंबरे पाटील तसेच पुणे शहर महिला काॅंग्रेस अध्यक्षा पूजा आनंद, शोभना पण्णीकर तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ऍड मनिषा कावेडिया उपस्थित होत्या सोबत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे संयुक्त निवेदन प्रत जोडली आहे

Leave a Reply

%d bloggers like this: