जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

पुणे : जागतिक महिला दिना निमित्त एसपीबी स्टुडिओच्या संचालिका, युवा उद्योजिका पायल भरेकर यांनी विविध क्षेत्रातील महिलांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित केले. यावेळी नगरसेविका सायली वांजळे, नगरसेविका प्रिया गदादे, नगरसेविका राजश्री नवले, मिस पिंपरी चिंचवड प्रतीक्षा थोरात, पूजा पवार, शांताई भरेकर, आंबेगावच्या सरपंच निर्मला बेलदरे, मनीषा निवांगुणे, संगीता भरेकर, प्रभावती भूमकर, हर्षल निकम, प्रकाश भरेकर, गणेश तनपुरे, पीएसआय एकनाथ भूमकर, निलेश बिबवे, श्याम भरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी प्रास्ताविकपर भाषणात बोलताना युवा उद्योजिका पायल भरेकर म्हणाल्या, महिला दिना निमित्त पुरुष महिलांचा सन्मान करतात हे चांगले आहे. मात्र महिलांनी महिलांचा सन्मान करत त्या ज्या क्षेत्रात कार्यरत असतील त्यामध्ये त्यांनी भरीव कामगिरी करावी यासाठी प्रेरणा देण्याचे काम करण्याची सुद्धा आज गरज आहे. नगरसेविका सायली वांजळे यांनी पायल भरेकर यांच्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करत पुरस्कार विजेत्या महिलांचे आणि एसपीबी फॅशन डिझाईन स्टुडिओच्या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली शितोळे यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: