Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

भोसरीमध्ये महापारेषणकडून नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित

औद्योगिक ग्राहकांना देखील २४ तास वीजपुरवठा सुरळीत

पुणे : भोसरी येथील अतिउच्चदाब २२० केव्ही उपकेंद्रातील नादुरुस्त पॉवर ट्रान्सफॉर्मर महापारेषण कंपनीकडून केवळ चार दिवसांत बदलण्यात आला आहे. त्यामुळे भोसरी एमआयडीसीधील ७५०० औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा रविवारी (दि. २७) सकाळी ७ वाजेपासून १२ ऐवजी २४ तासांसाठी पूर्ववत झाला आहे. उर्वरित सर्व ग्राहकांना महावितरणकडून यापूर्वीच पर्यायी व्यवस्थेतून २४ तास वीजपुरवठा देण्यात येत आहे.

महापारेषण कंपनीच्या भोसरीमधील अतिउच्चदाब २२० केव्ही उपकेंद्रामध्ये १०० एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये बुधवारी (दि. २३) सकाळी ६ वाजता बिघाड झाला होता. त्यामुळे भोसरी व आकुर्डी परिसरातील महावितरणच्या सुमारे ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला होता. त्यातील ७५०० औद्योगिक ग्राहक वगळता उर्वरित सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून पूर्ववत करण्यात आला आहे. मात्र भारव्यवस्थापन शक्य होत नसल्याने आठ वीजवाहिन्यांवरील ७५०० औद्योगिक ग्राहकांना नाईलाजाने चक्राकार पद्धतीने १२ तास वीजपुरवठा देण्यात येत होता. या ग्राहकांचा वीजपुरवठा देखील आता पूर्ववत करण्यात आला आहे.

याआधीच्या नादुरुस्त पॉवर ट्रान्सफॉर्मरमुळे विविध उपकेंद्रांमध्ये वळविण्यात आलेला वीजभार येत्या शुक्रवार (दि. १ एप्रिल) पर्यंत टप्प्याटप्प्याने नव्याने कार्यान्वित झालेल्या पॉवर ट्रान्सफॉर्मरवरून देण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading