छबीलदास चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
पुणे : समस्त गुजराथी महाजन सिध्दमाता मंदिर, महाजन महिला मंडळ आणि छबीलदास चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक सत्कार कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला.
हरीष शाह आणि श्रीमती रूपा शाह यांच्या हस्ते शैक्षणिक आणि इतर बाबतीत यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष जे.के.सराफ, उपाध्यक्ष किरीटभाई शाह, सचिव बालेशभाई शाह यांनी पस्वागत केले.सोनल गुजराथी यांनी सूत्रसंचालन केले.
‘गुजराती समाजाला उद्यमशीलतेची परंपरा असली तरी सर्व क्षेत्रात विद्यार्थ्यांनी प्रगती करावी. त्यांना प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम उल्लेखनीय आहे,’असे प्रतिपादन हरीश शाह यांनी केले.
’१८१६ साली स्थापन झालेल्या गोपाळकृष्ण मंदिराचे व्यवस्थापन समस्त बारा जाती गुजराती महाजन ट्रस्ट मार्फत केले जाते. या ट्रस्टकडून दरवर्षी अनेक सेवाभावी उपक्रम आयोजित केले जातात. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा या उपक्रमांचा एक भाग आहे’, असे जे.के. सराफ यांनी सांगीतले.
