न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना को-पायलटची संधी

पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड शाळेतील इयत्ता नववीत शिकणारे एनसीसी एअरविंगचे विद्यार्थी सुजलराजे काळे, सुजल जाधव आणि मोनेश्वर पांचाळ यांना को-पायलट म्हणून विमानाच्या कॉकपीटमधून आकाशात भरारी घेण्याची संधी मिळाली.

एनसीसी ऑफीसर भरत महाजन, ग्रुप कॅप्टन रमेश जाधव यांच्या समवेत विद्यार्थ्यांनी एनडीए, खडकवासला येथून हा प्रवास केला. विमान उड्डाणानंतरचा थरार, धाकधूक, भीती, उंचावरून खाली दिसणारे विहंगम दृश्य याची अनुभती विद्यार्थ्यांनी घेतली. विमान कसे चालवायचे याचा प्रत्यक्ष अनुभव रमेश जाधव यांनी दिला. मुख्याध्यापिका दर्शना कोरके आणि उपमुख्याध्यापक विसापुरे यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

लहानपणापासून सैन्यात जाण्याचे माझे स्वप्न आहे. गेल्या वर्षीपासून शाळेत सुरू झालेल्या एनसीसी एबरविंगमुळे राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती आणि संरक्षण दलाबद्दल ओढ निर्माण झाली. या अनुभवामुळे माझा आत्मविश्वास वाला असून भविष्यात मी सैन्यात जाऊन उत्तम कामगिरी करेन, असा विश्वास सुजल जाधव याने व्यक्त केला.

Leave a Reply

%d bloggers like this: