Monday, June 15, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

आज दिवसभरात पुणे शहरात नवीन 15 कोरोना रुग्ण

पुणे :  पुणे शहरामध्ये  कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 15 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 12 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलासादायकबाब म्हणजे गेल्या 24 तासात एकही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही.

पुणे शहरात आजपर्यंत संख्या 6 लाख 61 हजार 808 इतकी झाली आहे. यापैकी 6 लाख 52 हजार 348 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत पुणे शहरात 9349 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 111 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 1 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 2041 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली  आहे.
 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading