Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मी तुमच्यासोबत येतो, टाका मला तुरुंगात – मुख्यमंत्र्यांचे भाजपला खुलं आव्हान 

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर व त्यांच्या नातेवाईकांवर तपास यंत्रणांच्या धाडी पडत आहेत. नुकतेच मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांचीही चौकशी झाली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले. तुम्हाला सत्ता पाहिजेत ना. ज्यांना पाहिजे त्यांना पेनड्राईव्ह द्या. मी तुमच्यासोबत येतो. सत्तेसाठी येत नाही. याच्यावर टाच मार, त्याच्यावर टाच मार, कुटुंबीयांवर धाडी टाक हे जे काही तुम्ही जे चाळे केले आहेत. त्यामुळे मी तुमच्यासोबत येतो. टाका मला तुरुंगात, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना खुलं आव्हान दिल. ते आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, मी तुमच्या कुटुंबाचे कधी भानगडी काढल्या? याचं शेपूट त्याला, त्याचे शेपूट त्याला जोडलं जातं आहे. एवढाच जीव जळत असेल तर मला टाका तुरुंगात. मी थोडसं भावनिक बोलतो. बाबरीच्याखाली राम जन्मभूमी होती. तसे कृष्णजन्मभूीच्या खाली काही तुरुंग असेल तर बघा. तिथे मला टाका. मी कृष्ण नाही. पण तुम्ही कंस बनू नका, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, बाळासाहेबांना काय उत्तर देणार? असे मला विचारले जात आहे. बाळासाहेबांनी तुमच्या नेत्यांना वाचवलं ते तरी काय उत्तर देणार. देशात सर्व सांगत होते हे नको… हे नको. तेव्हा बाळासाहेब म्हणाले हे राहू द्या. काय उत्तर देणार. 2006 साली मी हिंदू होतो, आजही आहे. तुरुंगात टाकणार असाल तर मी सर्वांची जबाबदारी घेतो. माझ्या शिवसैनिकांचीही घेतो. टाका मला तुरुंगात. पण ज्या शिवसैनिकांनी मुंबई वाचवली, त्यांचा छळ कशासाठी? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading