मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते “महायुवा” ॲपचे अनावरण

मुंबई : शासकीय योजना, रोजगार संधी आणि पदवीधर तरुण यांच्या दरम्यान दुवा ठरू शकेल अशा ‘महायुवा’ ॲपचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विधान भवन समिती सभागृहात अनावरण करण्यात आले.

याप्रसंगी उद्योग मंत्री सुभाष देसाई, संसदीय कार्य, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, आमदार विलास पोतनीस तसेच सुरज चव्हाण, मिलिंद साटम आदी उपस्थित होते.

या ॲपवर मराठी, हिंदी आणि इंग्रजीत माहिती असेल. पदवीधर या ॲपवर आपले प्रोफाईल तयार करतील. त्यांच्याकडील विशेष प्राविण्य व आवडीचे क्षेत्र याबद्दलची माहिती अपलोड करेल. या आधारे त्याला उपलब्ध असलेल्या संधींची माहिती दिली जाईल.

Leave a Reply

%d bloggers like this: