fbpx
Thursday, April 25, 2024
BusinessLatest News

मुद्रांक शुल्काबाबत राज्य सरकारचा निर्णय स्वागतार्ह –  क्रेडाई पुणे मेट्रो 

पुणे : राज्य सरकारने मुद्रांक माफीचा कालावधी १ वर्षाऐवजी ३ वर्षांसाठी वाढविण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे मत क्रेडाई पुणे-मेट्रोने व्यक्त केले आहे. परंतु, गेल्या काही वर्षात बांधकाम साहित्याच्या किमतींमध्ये झालेली वाढ यामुळे कमी होणार नसून त्याचा जो फटका बांधकाम क्षेत्राला बसला आहे त्यात या निर्णयाने काही फरक पडणार नसल्याची खंत बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या  क्रेडाई पुणे-मेट्रोने व्यक्त केली आहे. याविषयी बोलताना क्रेडाई पुणे-मेट्रोचे अध्यक्ष अनिल फरांदे म्हणाले, राज्य सरकारचा हा आदेश स्वागतार्ह आहे. परंतु, सिमेंट, स्टील आणि इतर सामग्रीच्या प्रचंड किंमतीच्या वाढीचा झालेला मोठा परिणाम यामुळे कमी होणार नाही.

मुद्रांक शुल्कात माफीचा कालावधी १ वर्षाऐवजी ३ वर्षांसाठी वाढविण्याचा निर्णय कमी कालावधीत आपली मालमत्ता विकणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी चांगला आहे आणि रिअल इस्टेट उद्योगाला मदत करण्यासाठी एक सकारात्मक पाऊल आहे. या निर्णयामुळे घर खरेदीला चालना मिळेल. तसेच अधिक बांधकाम, विक्री, रोजगाराच्या संधी आणि जलद कॅश फ्लो यांना यातून चालना मिळण्यास मदत होईल. कोरोनाच्या धक्क्यातून सावरत असलेल्या या उद्योगांसाठी सरकारने अशा प्रकारच्या योजना वाढवल्या पाहिजेत. रिअल इस्टेट हा गुंतवणूकदारांसाठी सर्वात सुरक्षित आणि सर्वोत्तम गुंतवणुकीचा पर्याय आहे ज्यांना मालमत्तेच्या किंमतीचा चांगला परतावा मिळतो किंवा भाड्याच्या उत्पन्नाचा फायदा देखील होतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading