s. Balan T20 League – माणिकचंद ऑक्सिरीच, एसके डॉमिनेटर्स इलेव्हन संघांचा सलग दुसरा विजय

पुणे : पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित तिसर्‍या ‘एस. बालन टी-२० लीग’ अजिंक्यपद आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत माणिकचंद ऑक्सिरीच आणि एसके डॉमिनेटर्स इलेव्हन या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदविला.

या स्पर्धेत धीरज मंत्री याच्या भेदक गोलंदाजीच्या जोारावर माणिकचंद ऑक्सिरीच संघाने क्रिकेट अ‍ॅकॅडमी ऑफ पठाणस् संघाचा १२७ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना माणिकचंद ऑक्सिरीचने २० षटकात १६३ धावा जमविल्या. यामध्ये अविनाश शिंदे (नाबाद ४१ धावा) आणि पलाश कोंढारे (३२ धावा) यांनी फलंदाजीमध्ये योगदान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना क्रिकेट अ‍ॅकॅडमी ऑफ पठाणस् संघाचा डाव ३६ धावांवर गुंडाळला गेला. विजयी ऑक्सिरीच संघाच्या धीरज मंत्री याने १० धावात ३ गडी तसेच निखील भोगले (३-७) आणि अक्षय जाधव (२-४) यांनी चमकदार गोलंदाजी केली.

अजय बोरूडे याच्या नाबाद ४७ धावांच्या जोरावर एसके डॉमिनेटर्स संघाने गेम चेंजर्स संघाचा ५ धावांनी रोमहर्षक पराभव केला. एसके डॉमिनेटर्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना अजय बोरूडे (नाबाद ४७), अक्षय पंचारीया (२६ धावा), गणेश महापुरे (२० धावा) आणि सागर सिंग (२२ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर १३९ धावांचे आव्हान उभे केले. याला उत्तर देताना गेम चेंजर्स इलेव्हनचा डाव १३४ धावांवर मर्यादित राहीला. कर्णधार नौशाद शेख याने ६५ धावांची खेळी केली. पण ही खेळी संघाचा पराभव टाळू शकली नाही.

माणिकचंद ऑक्सिरीचः २० षटकात ६ गडी बाद १६३ धावा (अविनाश शिंदे नाबाद ४१, पलाश कोंढारे ३२, धीरज मंत्री १६, विजय सहानी २-२४, दर्शन दातिर २-२७) वि.वि. क्रिकेट अ‍ॅकॅडमी ऑफ पठाणस्ः १२ षटकात १० गडी बाद ३६ धावा (प्रतिक प्रदीप १३, धीरज मंत्री ३-१०, निखील भोगले ३-७, अक्षय जाधव २-४); सामनावीरः धीरज मंत्री;

एसके डॉमिनेटर्सः २० षटकात ८ गडी बाद १३९ धावा (अजय बोरूडे नाबाद ४७, अक्षय पंचारीया २६, गणेश महापुरे २०, सागर सिंग २२, शुभम मेद ३-२०, नौशाद शेख ३-२२) वि.वि. गेम चेंजर्स इलेव्हनः २० षटकात ६ गडी बाद १३४ धावा (नौशाद शेख ६५ (५२, ७ चौकार, १ षटकार), शुभम रांजणे ३६, महेश वाघिरे २-२८, कुणाल सुर्वे २-२१); सामनावीरः अजय बोरूडे;

Leave a Reply

%d bloggers like this: