Monday, June 15, 2026
Latest NewsSports

पीडीएफ तर्फे फुटबॉल प्रशिक्षक मार्गदर्शन तीन दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन !!

पुणे : पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेने  येत्या नवीन फुटबॉल हंगामाकरिता सर्व उदयोन्मुख फुटबॉल प्रशिक्षक यांच्यासाठी प्रशिक्षक मार्गदर्शन मोहीम हाती घेतली असून, एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात संघटने मार्फत तीन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संघटने मार्फत कळविण्यात आले.

या कार्यशाळेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांचे उमेदवारांना मार्गदर्शन मिळणार असून, त्यामध्ये खेळाच्या कायद्यांबद्दल माहिती देण्यात येईल. तसेच त्यांना मैदानावरील प्रात्यक्षिकाचे धडे सुद्धा दिले जातील. कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी सर्व उमेदवारांची परीक्षा घेऊन त्यांना संघटनेमार्फत रेफ्रि ओळख क्रमांक (RIN) दिला जाईल व प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येईल. तसेच संघटनेमार्फत खेळल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये रेफ्रि म्हणून कामकारण्याची संधी सुद्धा सर्व उत्तीर्ण उमेदवारांना उपलब्ध होऊ शकेल.
याच बरोबर जे विद्यमान रेफ्रि आहेत त्यांचे करिता रिफ्रेशर कार्यशाळेचे आयोजन सुद्धा याच कालावधीत करण्यात येणार आहे, ज्यामध्ये या सर्व विद्यमान रेफ्रि यांना कायद्यात झालेले बदल/दुरुस्त्या यांचे बद्दल माहिती दिली जाईल.

तरी कार्यशाळेमध्ये सहभागी होऊ इच्छित असणाऱ्या सर्व उमेदवारांनी आपली नावे कृपया दिनांक २८ मार्च २०२२ पूर्वी श्री. किशोर चौधरी यांना  +९१ ९९२३७ ८८७८७ ह्या क्रमांकावर पाठवावीत असे आवाहन संघटनेमार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading