200 मिनी इलेक्ट्रॉनिक बस पुणे महानगरपालिका घेणार  – विक्रम कुमार

पुणे : मी15 मार्च पासून प्रशासक म्हणून सूत्र हातात घेतली आहेत. त्यानंतर चालू वर्षातील अंदाजपत्रकाच्या अंमलबजावणीला सुरूवात केली. एक एप्रिल पासून नव्या बस पी एम पी एल प्रशासन व महानगरपालिका प्रशासन चालू करत आहे. दोनशे नवीन मिनी इलेक्ट्रॉनिक बस पुणे महानगरपालिका विकत घेणार आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे प्रशासन व आयुक्त विक्रमकुमार यांनी पत्रकार परिषदेत  दिली.

पुणे महानगरपालिकेचे  विक्रमकुमार यांनी प्रशासक झाल्यानंतर आज पहिल्यांदा पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. विक्रम कुमार म्हणाले,कोरोना चौथी लाट येण्याची शक्यता आहे. अजूनही काही जणांची दुसरी लस झाली नाही. कोरोना परत वाढला तर काळजी म्हणून मेडिकल महाविद्यालयाची सोमवारी राज्य शासनाच्या पथकानं पाहणी केली असल्याचेही विक्रम कुमार यांनी सांगितले. 

विक्रम कुमार हे प्रशासक पदी रुजू झाल्यानंतर. विक्रम कुमार यांनी पथारी व्यावसायिक पाठोपाठ मनपाच्या इमारती वास्तु व जागा व्यवसायिकांना दणका दिला आहे. त्यावर विक्रम कुमार म्हणाले, पालिका आयुक्त म्हणून अतिक्रमणमुक्त फुटपाथ होण्यासाठी प्रयत्न करत आहोत. तसेच 15 मे पर्यंत शहरातील सर्व रस्त्यांची कामं, पावसाळ्या पूर्वी रस्त्यांची काम पूर्ण होणार असल्याचे आश्वासनही विक्रम कुमार यांनी दिले. 

नदी सुधार प्रकल्पाला राज्य शासनाने ब्रेक लावला आहे. त्यावर काही सामाजिक संस्थांनी पण आक्षेप  घेतला आहे. त्यावर विक्रम कुमार म्हणाले, नदी सुधार प्रकल्पासाठी काही पर्यावरण प्रेमींनी विरोध केलाय. त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करून नदी सुधार प्रकल्प पुन्हा लवकरच सुरू होईल असे देखील विक्रमकुमार म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: