गोदरेज इंटरिओ पायाभूत सुविधा व्यवसाय अधिक मजबूत करणार 

मुंबई : गोदरेज ग्रुपची प्रमुख कंपनी असलेल्या गोदरेज अँड बॉयसतर्फे घर आणि संस्थात्मक विभागांमधील भारतातील अग्रगण्य फर्निचर सोल्यूशन्स ब्रँड असलेल्या गोदरेज इंटेरिओने स्वतःचा पायाभूत सुविधा व्यवसाय अधिक मजबूत करण्यात येणार असल्याचे आज जाहीर केले. तसेच पुढील आर्थिक वर्षात रू. ३०० कोटींचा व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. तसेच आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत एकूण बाजारपेठेतील १५% हिस्सा प्राप्त करण्याची ब्रँडची योजना आहे.

वर्ष २०१९ पासून आजवर ब्रँडने या आधीच रू. ४५० कोटी किमतीचे पायाभूत सुविधा प्रकल्प (इन्फ्रा प्रोजेक्ट्स) पटकावलेले आहेत. पायाभूत प्रकल्पांतगर्त कामाच्या सर्वसामान्य आवाक्यामध्ये सिव्हिल फिनिश, क्लॅडिंग, ब्लॉक वर्क, दर्शनी भाग ग्लेझिंग, अंतर्गत सजावट (इंटिरियर), आर्ट फॉर्म आणि आर्किटेक्चरल फिनिश इत्यादी कामांचा समावेश होतो.

कंपनीच्या अनुभवी ‘स्पेस प्लॅनिंग प्रोफेशनल्स’च्या टीममध्ये वास्तुविशारद, इंटिरियर डिझायनर आणि प्रोजेक्ट मॅनेजर यांचा समावेश आहे, ज्यायोगे ग्राहकांना एक संपूर्ण समन्वित व अखंडित अनुभूती मिळते. सामान्य करारांच्या जोडीलाच गोदरेज इंटेरिओ सिव्हिल आणि इंटीरियर कामाचे डिझाईन आणि अंमलबजावणी, एमईपी यंत्रणा, सुरक्षा आणि निगराणी (देखरेख) ठेवणे, हरित सल्लासेवा (ग्रीन कन्सल्टन्सी) आणि दृकश्राव्य उपकरणे (ऑडिओ-व्हिज्युअल सोल्यूशन्स) यांचा पुरवठा करते.

गोदरेज इंटेरिओचे मुख्य कामकाज अधिकारी (सीओओ) अनिल सैन माथूर म्हणाले, “भारतातील पायाभूत सुविधा प्रकल्प हे नेहमीच आमच्यासाठी प्राधान्याचे क्षेत्र राहिलेले आहेत आणि आम्हाला खात्री आहे, की सध्या अंदाजे ५००० कोटी रुपयांच्या आसपास मूल्य असलेल्या या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आणखी वाढीची क्षमता नक्कीच सामावलेली आहे. सध्या, आमच्या पूर्णतः व्यावसायिक अशा (बी२बी) प्रकल्पांच्या एकूण उलाढालीमध्ये आमच्या प्रमुख (टर्न की) प्रकल्पांचे ४०% टक्क्यांपर्यंतचे योगदान आहे. आमची ही टर्न की सोल्यूशन्स वितरीत करण्यात आम्ही अग्रेसर असून संपूर्ण देशभरात एक मजबूत सार्वजनिक वाहतूकीचे जाळे निर्माण करण्याच्या भारताच्या ध्येयदृष्टीकोनात सक्रीयपणे सहभागी होऊन आम्ही प्रवाशांना जागतिक दर्जाचा अनुभव प्रदान करण्यासाठी संबंधित मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन आणि विमानतळ प्राधिकरणांसोबत जवळीकीने काम करत आहोत. आम्हाला खात्री आहे की आमचे हे नाविन्यपूर्ण डिझाइन सोल्यूशन्स आमच्या भागीदारांना, मेट्रो प्रकल्पांना खूप सहाय्यभूत ठरतील आणि उत्तम दृश्यमानता व कार्यक्षमता या दोन्ही बाबतीत सर्वोच्च मानकांची पूर्तता करतील.”

Leave a Reply

%d bloggers like this: