… तर संघाला ‘जनाब संघ’ म्हणयाच का? – संजय राऊत
नागपुर : सरसंघचालक मोहन भागवत यांची गेल्या काही काळातील मुस्लिम समाजाविषयीची वक्तव्य पाहिली तर संघालाही ‘जनाब संघ’ म्हणायच का? मोहन भागवत यांनी गेल्या काही वर्षात अनेकदा सांगितलं मुस्लिम आणि हिंदूचा डीएनए सारखा असल्याचे विधान केले आहे. म्हणून ते जनाब संघाचे प्रमुख झाले का?, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज उपस्थित केला.
आज खासदार संजय राऊत हे इतर शिवसेना खासदारांसाह ‘शिवसंवाद’ यात्रेसाठी नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, हिंदु-मुसलमान जसे भाजपला मतदान करतात तसे शिवसेनेलाही मतदान करतात. हिंदुत्वाची विचारधारा घेऊन जाणारी संघ एक प्रमुख संघटना असून ती नागपुरात आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांची गेल्या काही काळातील मुस्लिम समाजाविषयीची वक्तव्य पाहिली तर संघालाही ‘जनाब संघ’ म्हणायच का? असा प्रश्न पडतो. आम्हाला ते ‘जनाब सेना’ म्हणता मग भाजपने अल्पसंख्याक सेल कुणासाठी निर्माण केला? मग आम्ही तुम्हाला ‘मियाँ खान.. मौलाना..’ असे म्हणायचं का?, असा प्रश्न उपस्थित केला.
अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला ही चूक होती
राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्याबाबत काय पुरावे आहेत हे आम्ही पाहिलय. त्यांच्या घरावर सीबीआयने 22, ईडीने 50च्यावर, आयकर विभागाने 40 धाडी घातल्या. यातून कोणता विक्रम प्रस्थापित केला? अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणं ही चूक होती. अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय घाई घाईत झाला. थोडं संयमाने घ्यायला हवं होत, अशी स्पष्ट कबुलीही शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज दिली.
