कोरटेक इंटरनॅशनलने सेबीकडे डीआरएचपी केले दाखल  

पाईपलाईन टाकण्याच्या सुविधा प्रदान करणारी कंपनी कोरटेक इंटरनॅशनलने भांडवल बाजार नियंत्रक सेबीकडे ‘ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’ (डीआरएचपी) दाखल केले आहे.

आयपीओमार्फत फंड्स उभारणी करण्याची कंपनीची योजना असून यामध्ये ३५० कोटी रुपयांच्या नव्याने जारी करण्यात आलेल्या इक्विटी समभागांचा व प्रमोटर्सकडून ४० लाख समभागांच्या विक्रीचा समावेश असणार आहे.  नव्याने जारी करण्यात आलेल्या समभागांच्या विक्रीतून मिळणारे भांडवल डिबेंचर्स सोडवण्यासाठी, कर्जांची परतफेड करण्यासाठी, नवीन उपकरणांच्या खरेदीसाठी भांडवली खर्च म्हणून, उपकंपन्यांमध्ये इक्विटी वाढवण्यासाठी, कंपनीच्या प्रोत्साहनात्मक कामासाठीच्या भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी फंड्स म्हणून आणि सर्वसामान्य कॉर्पोरेट कामांसाठी वापरले जाणार आहे.

कोरटेक इंटरनॅशनल ही पाईपलाईन टाकण्याच्या सुविधा प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करून असलेल्या भारतातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असून त्यांच्या कामांमध्ये हायड्रोकार्बन पाईपलाईन टाकण्याच्या कामांचा देखील समावेश आहे.  तेल व वायू रिफायनरीज आणि पेट्रोकेमिकल परिसरांमध्ये सामग्री व फीड हाताळणीसाठी प्रक्रिया सुविधांसाठी ईपीसी (अभियांत्रिकी, खरेदी व उभारणी) सुविधा पुरवण्याचे काम देखील ही कंपनी करते.

Leave a Reply

%d bloggers like this: