अरुण दाते यांच्या अजरामर भावगीतांचा ‘नवा शुक्रतारा’ २६ मार्चला पुण्यात

पुणे : मराठी भावसंगीताच्या विश्वातील अत्यंत लोकप्रिय गायक अरुण दाते यांनी गायलेली  बहुतांश भावगीते प्रामुख्याने कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या लेखणीतून साकारली आहेत. मार्च महिन्यात असणारा पाडगावकर यांच्या जन्मदिवस तसेच शुक्रतारा मंद वारा या गाण्याच्या रेकॉर्डिंगला यंदा ६० वर्षे पूर्ण होत आहेत या निमिताने येत्या शनिवारी, दिनांक २६ मार्च रोजी सायंकाळी ५:३० वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे  ‘नवा शुक्रतारा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून मोफत प्रवेशिका कार्यक्रम स्थळी १ तास अगोदर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर दिल्या जातील. प्रवेशिका असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. अतुल अरुण दाते प्रस्तुत या कार्यक्रमाला गोखले कन्स्ट्रक्शन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले व पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे अध्यक्ष अजित गाडगीळ यांचे सहकार्य लाभले असून हा ‘नवा शुक्रतारा’ या कार्यक्रमाचा ५०वा शो असेल हे विशेष.

सदर कार्यक्रमात नव्या पिढीचे आघाडीचे गायक – संगीतकार मंदार आपटे, वर्षा जोशी, अनुश्री फडणीस आणि स्वतः अतुल अरुण दाते आदी प्रमुख कलाकारांबरोबरच विविध वादक कलाकार सहभागी होतील. कार्यक्रमात अरुण दाते ह्यांच्या जीवनाशी निगडित अनेक रम्य आठवणींबरोबरच यशवंत देव आणि मंगेश पाडगावकर यांच्याशी संबंधित काही दुर्मिळ व्हीडीओ देखील दाखवले जातील.

Leave a Reply

%d bloggers like this: