किचन कल्लाकारच्या किचनमध्ये ‘लाडू’ची धमाल

किचन कल्लाकारमध्ये बच्चे कंपनीचा कल्ला
‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय कार्यक्रमातील लाडू म्हणजेच बालकलाकार राजवीर याने प्रेक्षकांच्या मनात अढळस्थान निर्माण केलं. लाडूला प्रेक्षक आजही विसरले नाही आहेत. आता हाच लाडू प्रेक्षकांना किचन कल्लाकारच्या किचनमध्ये दिसेल. किचन कल्लाकारच्या आगामी भागात बच्चे कंपनी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या भागात लाडू सोबत अभिनेत्री स्नेहलता वसईकरची मुलगी शौर्या वसईकर आणि गायक राहुल देशपांडे याची मुलगी रेणुका देशपांडे देखील सहभागी होणार आहे.
हि मुलं कल्लाकारच्या किचनमध्ये खूपच कल्ला करताना दिसणार आहेत. लाडू म्हणजे छोटा पहेलवान आणि त्याला सामान मिळवण्यासाठी शेठ सोबत बैठका मारण्याची स्पर्धा करावी लागली. लाडू त्या स्पर्धेत शेठला मागे टाकतो. त्याचसोबत शौर्याला देखील सामान मिळवण्यासाठी अनेक कडू, गोड, आंबट रसांचा आस्वाद घ्यावा लागला. या बच्चेकंपनीने अजून काय काय धमाल केली आणि महाराजांसाठी काय पदार्थ बनवले हे किचन कल्लाकारच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: