Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

पार्किंग प्रश्नावर प्रकल्प सादरीकरण स्पर्धा

पुणे : मेट्रोच्या आगमनानंतरही उदभवलेल्या पार्किंग प्रश्नावर उत्तरे शोधण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थ तर्फे प्रकल्प सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.रोटरीच्या वतीने डॉ. श्रीकांत केळकर , अरुणा केळकर, रोटरी क्लब पूना नॉर्थ च्या अध्यक्ष मनिषा कोनकर, गिरीश कोनकर आणि सहकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पुणे आणि पिंपरी -चिंचवड पालिका क्षेत्रासाठी ही स्पर्धा असून व्यक्तिगत स्पर्धक किंवा गट सहभागी होऊ शकतो. पुण्याचा विस्तार, मेट्रोचे आगमन, यानंतरही न सुटलेल्या वाहनांच्या पार्किंग प्रश्नावर या प्रकल्प सादरीकरण स्पर्धेद्वारे उत्तर शोधले जाणार आहे.आर्किटेक्चर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, अभियंते,नगरनियोजनातील तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकार, सर्वेक्षक, नागरिक सहभागी होऊ शकतात.या पार्किंग प्रश्नावर ३ हजार शब्दात,५ पानांएवढा प्रकल्प , मॉडेल,संकल्पना सादर करायचे आहे.हे प्रकल्प पर्यावरण पूरक असावेत , संभाव्य खर्चासह सर्व तांत्रिक तपशील मांडलेला असावा . rcpn.parking@gmail.com या इमेलवर प्रकल्प पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे .तज्ज्ञांद्वारे परीक्षण केले जाईल.विजेत्यांना, प्रथम ३ क्रमांकांना अनुक्रमे ६० हजार, ४० हजार, २० हजार रुपये अशी पारितोषिके दिली जाणार आहेत.विद्यार्थी गटात प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.

३० एप्रिल ही प्रकल्प, संकल्पना सादर करण्याची अंतिम तारीख आहे. १ जून रोजी निकाल जाहीर केला जाईल. ८जूनच्या सुमारास समारंभपूर्वक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला जाईल.या विजेत्या प्रकल्पांचे नंतर तज्ञांपुढे सादरीकरण आयोजित केले जाणार आहे. संबंधित शासकीय विभागांशी देखील संपर्क साधला जाणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading