सामाजिक उद्योजक नितीन देसाई यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

पुणेः- येथील पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे गेली 32 वर्षे सातत्याने दिला जाणारा आणि 

देशासह परदेशातही प्रतिष्ठेचा समजला जाणारा 2022 सालचा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक आणि समाजसेवक नितीन देसाई यांना प्रदान करण्यात येणार आहे, असे पुण्यभूषण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे. 

विविध क्षेत्रातील आपल्या अतुलनीय योगदानाने पुण्याचे नाव जगभर पोचविणा-या पुणेकरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने उद्योग क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल नितीन देसाई यांची यंदाच्या पुण्यभूषण पुरस्कारासाठी निवड केली आहे. स्मृतिचिन्ह आणि रूपये एक लाख रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरणा-या बालशिवाजींची प्रतिकृती आणि पुण्याच्या ग्रामदैवतांचे छायाचित्र असलेले  स्मृतिचिन्ह हे या पुरस्कारचे वैशिष्ट्य आहे. यंदाचा हा पुरस्कार दिनांक 1 जुलैनंतर होणा-या खास समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. तसेच यानिमित्त सीमेवर कर्तव्य बजावत असताना जखमी झालेल्या वीर जवानांचा गौरव देखील यावेळी करण्यात येणार आहे. त्यामध्ये हवालदार मोहम्मद फैय्याज  आलम, लान्स नाईक जयेंद्र भेंडेरकर, लान्स नाईक एम.जे.चाको,  गनर समशेरसिंग आणि शिपाई वलसालन नादर यांचा गौरव करण्यात येणार आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: