fbpx

महिला अत्याचाराचे समर्थन करणारे ठाकरे सरकार – चित्रा वाघ

पुणे : महाराष्ट्रातील ठाकरे सरकार अत्यंत अहंकारी, खुनशी व मुख्यतः महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालणारे व वेळ प्रसंगी त्यांचे समर्थन करणारे हे विकृत सरकार आहे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.

पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघाने आयोजित केलेल्या विराट महिला महिला मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी कॅंटोनमेंट मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे, माजी मंत्री दिलीप कांबळे, आमदार जगदिशजी मुळीक, पुणे शहर महिला मोर्चा अध्यक्ष अर्चना पाटील, प्रीती सुनिल कांबळे, पुणे शहर उपाध्यक्ष डॉ. श्रीपाद ढेकणे, शहर चिटणीस कोमल शेंडकर, माधुरी गिरमकर, सुर्वर्णा भरेकर, उज्वला गौड, महिला मोर्चाच्या अध्यक्षा दिप्ति पाटोळे, महेशजी पुंडें अध्यक्ष कॅ.म.संघ, नगरसेवक धनराज घोगरे, नगरसेवक उमेश गायकवाड, नगरसेवक दिलिप गिरमकर, सचिन मथुरावाला, उपाध्यक्ष पुणे कॅ.बोर्ड लता धायरकर, कालिंदा पुंडे, मनिषा लडकत, मंगला मंत्री, किरणताई मंत्री, प्रियांका श्रिगिरी, लक्ष्मी घोडके, सुधिर जानजोत आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मेळाव्यात महिला अत्याचाराची विविध उदाहरणे प्रस्तुत करत ठाकरे सरकार हे महिलांना असुरक्षित करते आहे, असे प्रतिपादन चित्रा वाघ यांनी केले. त्या म्हणाल्या, शिवसेना नेत्यावर बलात्काराचा आरोप होऊनही संपूर्ण पोलिस खाते त्याच्या समर्थनार्थ काम करत आहे. तसेच वडगाव शेरी येथील शाळेत विद्यार्थिनिवर झालेल्या चाकू हल्ल्यात शाळेची कोणतीच जबाबदारी नाही का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्याच वेळेस सरकारची आरती ओवाळणाऱ्या पोलीस खात्यात अनेक प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत त्यांच्यामागे समाजाने व भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने सक्षमपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने कॅन्टोन्मेंट मतदारसंघात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वर्गीय सुषमा स्वराज्य यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी दलित इंडस्ट्रियल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज महिला आघाडीच्या प्रमुख महिला उद्योजक निर्माण होण्यासाठी कार्यरत असलेल्या सीमा कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. भारतीय जनता पार्टी रा.स्व. संघाच्या विचारधारेनेच चालत असून महिलांना सन्मानपूर्वक वागणूक देण्याचे परंपरा या पक्षात आहे, असेही सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: