सोनी मराठीवरील ज्ञानेश्वर माउली मालिकेत ज्ञानेश्वरीस आरंभ

सोनी मराठीवरील ‘ज्ञानेश्वर माउली’ या मालिकेत आता नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. काल २० मार्चपासून ज्ञानेश्वरीच्या लिखाणाचा आरंभ झालेला असून मालिकेत माऊलींचे विविध चमत्कार प्रेक्षकांना बघायला मिळाले आहेत. माउलींना मिळालेला अनुग्रह, रेड्यामुखी वदवलेले वेद, माउलींचा पहिला कीर्तन सोहळा अशा अनेक कथांनी प्रेक्षक भक्तिमय झाले. पण आता मालिकेत भगवान श्रीकृष्णाच्या साक्षीने ज्ञानेश्वरीचा आरंभ होणार आहे.

मालिकेत श्रीकृष्णाचे पात्र अभिनेता अक्षय वाघमारे साकारणार आहे. ज्ञानेश्वरीच्या साथीने माउली विश्वउद्गार करणार असून प्रेक्षकांना ज्ञानेश्वरीचा अवर्णीय अनुभव अनुभवयाला मिळणार आहे. कोणतेही संकट न येत माउली ज्ञानेश्वरी लिहू शकतील का? ज्ञानेश्वरीच्या साथीने माउली कशाप्रकारे विश्वउध्दार करणार? या सगळ्याची उत्तरे प्रेक्षकांना मालिकेतून उलगडणार आहेत.

 

Leave a Reply

%d bloggers like this: