वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात तेजस मोरे पाठोपाठ भाजप कार्यकर्त्याकडून पोलिसात तक्रार

पुणे: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला होता. त्यानंतर राज्यात खळबळ माजली होती. फडणवीसांच्या गंभीर आरोपांनंतर विशेष सरकारी वकि चव्हाण राजीनामा घेण्यात आला होता. प्रवीण चव्हाण यांनी पण तेजस मोरे यांच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. काल रात्री तेजस मोरे यांनी  प्रवीण चव्हाण विरुद्ध शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. आज सकाळी वकिल प्रविण चव्हाण यांच्याविरुध्द भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.

यामध्ये भाजपा नेते गिरीश महाजन यांच्याविरुध्द वकिल चव्हाण हे कट कारस्थान रचत असल्याचे सांगण्यात आले आहे.
तेजस मोरे चे वकील अनुप कुमार म्हणाले, तेजस मोरे यांच्या जिवाला प्रवीण चव्हाण यांच्याकडून धोका आहे. काही लोकांकडून सतत तेजस मोरे यांना त्रास दिला जात आहे. प्रवीण चव्हाण यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी असे आम्ही पोलिसांना तक्रार केलेल्या अर्जात म्हटले आहे. असे अनुप कुमार म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: