आजी-माजी संचालकांमुळेच ‘आदिनाथ’ अडचणीत आला-अतुल खूपसे पाटील यांचा गौप्यस्फोट

करमाळा : शेतकरी सुखी व्हावा, कामगारांच्या हाताला काम मिळावे म्हणून स्व. गोविंदबापूंनी १४ वर्ष चप्पल न घालता आदिनाथ उभारण्याचे स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरविले. बापूंच्या त्यागामुळे आणि कष्टामुळे शक्य हे झाले. मात्र त्यानंतर आजातागायत होऊन गेलेल्या सर्व संचालक मंडळाची वक्रदृष्टी आदिनाथ वर पडली आणि कारखाना डबघाईला आला. जमेल तसे, मिळेल तिथे या लोकांनी कारखाना ओरबाडून खाल्ला असा गौप्यस्फोट करून आज पर्यंत च्या संचालक मंडळाची प्रॉपर्टीची चौकशी केली तरी आदिनाथ कारखाना चालू होईल असे स्पष्ट प्रतिपादन ‘जनशक्ती’चे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी केले.

मांजरगाव (ता. करमाळा) येथे जनशक्ती शेतकरी संघटनेचा मेळावा पार पडला यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की करमाळा तालुक्यातील शेतकरी बागल पाटील व शिंदे गटात विभागले आहेत. मात्र अडचण आली की जनशक्ती संघटनेची आठवण होते. मात्र संघटना कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. मांजरगाव लगत गेलेल्या रेल्वे लाईन मुळे शेतकरी सतत अडचणीत येतो. त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या तीस वर्षापासून रस्त्यासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला अद्याप मिळाला नाही यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. लोकप्रतिनिधींना हे प्रश्न विचारणे चे धाडस तुम्ही करत नाहीत म्हणून या लोकांचे फावते. येणाऱ्या काळात संघटनेची बांधिलकी म्हणून युवा शेतकऱ्यांनी संघटनेमध्ये सक्रिय होऊन स्वतःच्या शेतीसाठी व संसारासाठी आवश्यक असलेली कामे संघटनेच्या माध्यमातून करून घ्यावे असेही त्यांनी शेवटी सांगितले.

यावेळी रामराजे डोलारे अक्षय देवडकर विठ्ठल कानगुडे दिपाली डिरे राणा महाराज सुदाम निकत सिद्धेश्वर चव्हाण गहिनीनाथ निकत संतोष मोरे नवनाथ हुंबे प्रल्हाद राऊत अंकुश चव्हाण गौतम खरात आप्पा खरात संजय निकम गोविंद खरात परमेश्वर तांदळे सतीश चौधरी हरी खरात चंद्रकांत शिंदे वसीम पठान गोविंद चौधरी नितीन खरात श्रीराम खरात रमजान पठाण दादा खरात अंकुश चव्हाण अरविंद खरात मच्छिंद्र कोलते समाधान हुंबे संकेत निकत, अतुल राऊत, शरद एकाड अजित सय्यद, बालम शेलार, केतन वाळुंजकर, बबन शेख, भरत एकाड, सागर एकाड, गणेश एकाड, अक्षय एकाड, समाधान जाधव, किशोर शिंदे, दादासाहेब चव्हाण यांच्यासह जनशक्ती चे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: