fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात संकष्टीला २ हजार किलो द्राक्षांची आरास

पुणेः श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त सोमवारी (दि. २१ मार्च) गणपती मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम २ हजार किलो द्राक्षांची आरास केली जाणार आहे. ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम तसेच वृद्धाश्रमात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत.

द्राक्षाच्या हंगामात प्रथमच अशा पद्धतीची आरास मंदिरात केली जाणार आहे. दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात संपूर्ण सभामंडपात ही आकर्षक आरास केली जाईल. सोमवारी सकाळी ९ वाजता ही आरास पूर्ण होणार असून त्यानंतर भाविकांना पाहण्यासाठी खुली होणार आहे.

सह्याद्रीच्या शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वीच हा उपक्रम करण्यासाठी द्राक्षे देऊ केली होती, मात्र करोनामुळे आलेल्या निर्बंधांमुळे ते शक्य झाले नव्हते. आता हा योग जुळून येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading