Saturday, June 13, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पेनड्राईव्ह प्रकरणात तेजस मोरेने प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात पोलिसांत केली तक्रार

पुणे: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला होता. त्यानंतर राज्यात खळबळ माजली होती. फडणवीसांच्या गंभीर आरोपांनंतर विशेष सरकारी वकि चव्हाण राजीनामा घेण्यात आला होता, कारण फडणवीसांनी दिलेल्या पेनड्राईव्ह मध्ये प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयातील स्टिंग ऑपरेशन  होते. त्यानंतर आपल्याला स्वतःला या प्रकरणातून बाहेर व्हायचं आहे असं म्हणत विशेष सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांनी राजीनामा दिला. आता त्यांनी तेजस मोरे याच्या विरुद्ध पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर हा वाद अजून संपलेला नाही . तेजस मोरे यांनी आपल्या ऑडिओ क्लिप या सादर केल्या त्यात प्रवीण चव्हाण यांचे संभाषण पूर्णपणे ऐकू येत आहे.

सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी तेजस मोरे विरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती. त्याला सडेतोड उत्तर तेजस मोरे यांनी पण दिले आहे .त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
चव्हाण यांनी खोटे आरोप करून आपली बदनामी केली आहे. त्यांनीच माझी फसवणूक केली आहे. असा उल्लेख मोरे यांनी आपल्या तक्रार अर्जामध्ये केला आहे. ही माहिती शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांनी दिले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading