नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण : दोन्ही आरोपींना साक्षीदारांनं ओळखलं

पुणे:अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्ये मुळे पुणे शहर हादरले होते गेली कित्येक वर्षे या प्रकरणामधील आरोपींची ओळख पटत नव्हती .या प्रकरणांमधील महत्त्वाची घडामोड घडली आहे. नरेंद्र दाभोळकर यांच्या गोळ्या झाडणाऱ्या दोन आरोपींची ओळख पटली आहे. न्यायालयात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांने फोटोवरून दोन्ही आरोपींना ओळखलं. त्यामुळे या प्रकरणातील तपासाला आता निर्णयाक वळण मिळालं आहे.

पुणे महापालिकेत सफाई कर्मचारी असलेल्या किरण केशव कांबळे यांनी दोन्ही आरोपींना ओळखले आहे. किरण कांबळे २०१३ मध्ये घडलेल्या या घटनेतील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या दोन्ही नेमबाज आरोपींना प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखलं आहे. सचिन अंदूरे आणि शरद कळसकर अशी साक्षीदाराने ओळखलेल्या आरोपींची नावे आहे. पुणेविशेष न्यायालयासमोर दोन्ही आरोपींची ओळख पटवण्यात आली. यावेळी सीबीआयचे अधिकारीही हजर होते. किरण कांबळे यांनी फोटोवरून दोन्ही आरोपींना ओळखले आहे. या हत्येप्रकरणात सीबीआयनं सचिन अंदुरे याला औरंगाबादमधून अटक केलेली.

दरम्यान २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील शिंदे पुलावरून मॉर्निंग वॉक करत असताना दोन हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या घालून त्यांची हत्या केली. त्यानंतर पुणे शहर पोलिसांकडून २०१४ साली हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं. आतापर्यंत ५ आरोपींवर आरोपपत्र दाखल केले आहे.
सप्टेंबर २०२१ मध्ये न्यायालयाने या प्रकरणात एकूण पाच जणांवर आरोप निश्चित केलेले आहेत. यात आरोपी क्रमांक १, २, ३ आणि ५ असलेले डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि विक्रम भावे यांच्याविरुद्ध हत्येचा कट रचल्याचा गुन्हा निश्चित केलेला आहे. युएपीएच्या कलम १६ अंतर्गत न्यायालयाने हे आरोप निश्चित केलेले आहेत. आरोपी क्रमांक ४ असलेले वकील संजीव पुनाळेकर यांच्यावरही पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: