Parbhani – जयदीप भराडेची महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात निवड

परभणी : येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या बी.ए. च्या तृतीय वर्षात शिकणारा जयदीप दिलीपराव भराडे याची महाराष्ट्राच्या २५ वर्षाखालील क्रिकेट संघात निवड झाली आहे. आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे होणाऱ्या मेजर सी.के.नायडू स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात त्याला स्थान मिळाल्याने महाविद्यालयाच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला. जयदीप हा जलदगती गोलंदाज आणि अष्टपैलू फलंदाज म्हणून परिचित आहे. यापूर्वी तो १६, १९, २३ वर्षाखालील गटात महाराष्ट्राकडून खेळला आहे.


जयदीप भराडे यास क्रीडा संचालक प्रा.डॉ.संतोष कोकीळ, प्रवीण चाळक यांचे मार्गदर्शन मिळाले.
जयदीपच्या निवडीबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रकाश सोळंके, सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण ,महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख सदस्य हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, डॉ.विजया नांदापूरकर, गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ.रोहिदास नितोंडे, प्रा.सुनील चव्हाण, प्रा.राजेसाहेब रेंगे, प्रबंधक विजय मोरे आदींनी अभिनंदन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: