Friday, June 5, 2026
Latest NewsLIFESTYLE

सिस्काचे नवीन ५ इन १ मल्टी स्टायलिंग किट

मुंबई : व्यक्तिगत काळजी घेण्याच्या उपकरणांचा आघाडीचा ब्रँड सिस्का पर्सनल केयर अप्लायन्सेसने सिस्का ५ इन १ मल्टी स्टायलिंग किट (एचएस५०००के) बाजारपेठेत दाखल करत असल्याची घोषणा केली आहे. सर्वोत्तम वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेले हे नवे स्टायलिंग किट सध्याच्या काळातील व्यस्त आणि एकाच वेळी बरीच कामे कराव्या लागणाऱ्या महिलांसाठी अत्यावश्यक आहे. सलोनसारखे केस अगदी सहज आणि पटकन मिळवता यावेत ही त्यांची इच्छा सिस्काचे हे किट नक्की पूर्ण करेल. महिलांच्या स्वच्छता व स्टायलिंगशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी गरजेची असलेली नवनवीन व तंत्रज्ञानाने परिपूर्ण ग्रूमिंग उत्पादने सादर करण्यात सिस्का पर्सनल केयर अप्लायन्सेस आघाडीवर आहे.

नाविन्यपूर्ण आधुनिक हेयर स्टायलिंग उपकरणांच्या मागणीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.  सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करता यावे यासाठी केसांच्या स्टायलिंगसाठी सलोनमध्ये जाण्याऐवजी घरीच हेयर स्टायलिंग करण्याकडे लोकांचा कल वाढत असल्याने हा बदल घडून आला आहे.  सिस्का ५ इन १ मल्टी स्टायलिंग किट मध्ये सिरॅमिक कोटेड प्लेट्स आहेत, त्यामुळे मनाजोगता लुक मिळवण्यासाठी बाऊन्सी, ग्लॉसी, स्मूद, स्ट्रेट, क्रिम्पी किंवा वेवी अशी वेगवेगळी टेक्श्चर्स तयार करता येतील.  या मल्टी स्टायलिंग किटमध्ये ५ अटॅचमेंट्स आहेत आणि स्ट्रेटनिंग, कर्लिंग, क्रिम्पिंग व ब्रशिंगसाठी हे किट अगदी योग्य आहे.  या हेयर स्टायलिंग किटची १००-२४० वोल्ट्स वोल्टेज कॉम्पॅटिबिलिटी जगभरात चालण्याजोगी आहे.

सिस्का ग्रुपचे कार्यकारी संचालक गुरुमुख उत्तमचंदानी यांनी यावेळी सांगितले, आज महिला ग्राहकांना स्वतःच्या मनानुसार ग्रूमिंग व स्टायलिंग करता येईल अशी उपकरणे हवी असतात त्यामुळे हेयर स्टायलिंग साधनांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. “घरच्या घरी करता येईल असे स्टायलिंग” आणि “प्रवासात सहज वापरता येईल” असे दोन्ही उपयोग व्हावेत व महिला ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण व्हाव्यात या उद्देशाने आम्ही नवे सिस्का ५ इन १ मल्टी स्टायलिंग किट आणले आहे.  केसांचे नुकसान होऊ न देतामऊसूतआकर्षक स्टाईल करता यावी यासाठी सहज वापरण्याजोगे मल्टी स्टायलिंग किट खूप उपयुक्त आहे.”

सिस्का ५ इन १ मल्टी स्टायलिंग किटची महत्त्वाची वैशिष्ट्ये:

या स्टायलिंग किटमध्ये १ मुख्य युनिट (त्यासोबत ५ अटॅचमेंट्स – स्ट्रेटनरक्रिम्परकर्लरकॉनिकल कर्लरब्रश कोम्ब) आणि युजर मॅन्युअल आहे.

–          एलईडी इंडिकेटर: यातील स्ट्रेटनरमध्ये एक एलईडी इंडिकेटर आहे, त्यासोबत एक ऑन/ऑफ स्विच देखील देण्यात आला आहे.

–          पीटीसी हीटर: आधीच्या पद्धतीप्रमाणे हॉट वायर गरम करण्याऐवजी या स्ट्रेटनरमध्ये पीटीसी हीटिंग तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, जे वापरण्यास अधिक जास्त सुरक्षित, टिकाऊ आणि अधिक कार्यक्षम आहे.

–          (ओव्हरहीटिंग प्रोटेक्शन) अधिक जास्त गरम होण्यापासून रोखण्यासाठी संरक्षण: स्ट्रेटनरमध्ये ओव्हरहीटिंग प्रोटेक्शन सुविधा असून त्यामुळे एक विशिष्ट योग्य तापमान सतत कायम राखले जाते. त्यामुळे अति जास्त उष्णतेमुळे केसांचे नुकसान होणे टाळले जाते.

–          कूल टीप: स्ट्रेटनिंग आयर्नमध्ये एक कूल टीप असते ज्यामुळे अधिक चांगली ग्रीप मिळते व वापरत असलेल्या व्यक्तीच्या बोटांचा चुकून जरी स्पर्श झाला तरी बोटांना भाजत नाही.

–          ३६० डिग्री स्विवेल पॉवर कॉर्ड आणि हँगिंग लूप: या स्टायलिंग किटमध्ये एक ३६० डिग्री स्विवेल कॉर्ड आहे ज्यामुळे स्टायलिंग अगदी सहजपणे आणि जराही खंड न पडता करता येते.  यामध्ये हँगिंग लूप देखील आहे.

–          सोयीस्कर आकार व प्रवासात सहज जवळ बाळगता व वापरता येण्याजोगे: सिस्का ५ इन १ मल्टी स्टायलिंग किटचे डिझाईन अतिशय सुबक असून प्रवासात देखील हे सहज सोबत ठेवता येते व वापरता येते.

 

ग्रे व पिंक हे रंगांचे दोन पर्याय यामध्ये उपलब्ध असून सिस्का ५ इन १ मल्टी स्टायलिंग किटसोबत २ वर्षांची वॉरंटी दिली जाते. याची किंमत देखील अतिशय आकर्षक फक्त ३६९९ रुपये आहे. हे ग्रूमिंग उत्पादन सर्व मोठ्या ई-कॉमर्स साईट्सवर तसेच रिटेल दुकानांमध्ये व सिस्काच्या ऑनलाईन पोर्टलवर खरेदी करता येईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading