fbpx
Friday, April 26, 2024
ENTERTAINMENTLatest News

केतन पेंडसेची ‘कही किसी रोज’ रसिकांच्या भेटीला

चित्रपट जस समाजप्रबोधनाचे काम करतो तसे काही रहस्यमय व गूढपट रसिकांची झोप उडवतात. अशीच रहस्यमय आणि भय यांचा संगम असलेली ‘कही किसी रोज’ शॉर्ट फिल्म रसिकांच्या भेटीला आली आहे. केतन पेंडसे आणि राहुल साळुंखे नवीन हिंदी शॉर्ट फिल्म “कही किसी रोज” एमएक्स प्लेयर आणि हंगामा प्ले या ओट्ट प्लॅटफॉर्मवर रसिकांना पाहता येणार आहे. अनेक चित्रपट महोत्सवात अनेक पुरस्कार या फिल्मला मिळले आहेत.

निर्माते राहुल साळुंखे यांनी या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली असून ‘कही किसी रोज’ मध्ये अभिनेता केतन पेंडसे, राहुल साळुंखे सोबत मधुलिका भट्टाचार्य, विनिता सोनवणे, अनुश्री धाम मुख्य भूमिकेत आहेत.
केतन पेंडसे यांच्या “गुप्त” या मराठी शॉर्ट फिल्म ला ११ व्या पुणे इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल आणि 8वा गोवा इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार मिळले आहेत. केतनचे नुकतेच रिलीज झालेलं रोमँटिक गाणं “रूप तुझ भारी” खूप लोकप्रिय झाले आहे.

ग्लॅमफेम एंटरटेनमेंटने निर्मिती केलेली “ब्लू शू” शॉर्ट फिल्म अनेक फेस्टिव्हल’ मध्ये अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २०२२ मध्ये केतन पेंडसे आणि राहुल साळुंखे च्‍या नवीन कलाकृती आपल्‍याला लवकरच पहायला मिळतील. अशी माहिती केतन पेंडसे यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading