‘कृष्णा डायग्नॉस्टिक्स’च्या ‘चीफ ऑपरेटिंग ऑफिसर’ पदी डॉ. रविंदर सेठी

पुणे : सार्वजनिक-खासगी-भागीदारी (पीपीपी) या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कारभार असलेल्या  ‘कृष्णा डायग्नॉस्टिक्स लिमिटेड’ने आज डॉ. रविंदर सेठी यांची मुख्य कार्यान्वयीन अधिकारी (चीफ ऑपरेटिंग ऑफिसर – सीओओ) या पदावर नियुक्ती केली आहे. डॉ. सेठी यांनी यापूर्वी एफएमसीजी, दूरसंचार व आरोग्यसेवा या क्षेत्रांतील मोठ्या, आघाडीच्या संस्थांमध्ये मुख्य कार्यान्वयीन अधिकारी, विक्री व कार्यसंचालन या विभागांचे प्रमुख अशी पदे भूषविली आहेत. त्यांना एकूण २४हून अधिक वर्षांचा अनुभव आहे.

आपल्या नवीन पदावर डॉ. सेठी हे ‘कृष्णा डायग्नॉस्टिक्स’च्या १८००हून अधिक केंद्रांचे कार्यसंचालन, त्यांचा विस्तार आणि प्रगती यांसाठी जबाबदार असतील. अगदी दुर्गम ठिकाणीही गुणवत्तापूर्ण स्वरुपाच्या नैदानिक सेवा सुलभ आणि परवडण्याजोग्या उपलब्ध राहतील, याची दक्षता त्यांनी घ्यावयाची आहे. ‘कृष्णा डायग्नॉस्टिक्स’च्या वाढीला चालना देणे, नवीन प्रकल्प सुरू करणे आणि नवीन भौगोलिक क्षेत्रांमध्ये रिटेल केंद्रे सुरू करणे अशा इतरही जबाबदाऱ्या त्यांना देण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त कामकाजात गुणवत्ता राखणे, सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करणे, नावीन्यतेला प्रोत्साहन देणे आणि कर्मचारी वर्ग विकसीत करणे यांवर भर देऊन संस्थेला उत्कृष्टतेच्या उच्च स्तरावर पोहोचविण्याची जबाबदारीही डॉ. सेठी यांच्या खांद्यावर असेल.

या नियुक्तीविषयी माहिती देताना ‘कृष्णा डायग्नॉस्टिक्स’चे कार्यकारी संचालक यश मुथा म्हणाले, “कृष्णा डायग्नॉस्टिक्स’च्या परिवारामध्ये डॉ. रविंदर सेठी यांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. त्यांचे कौशल्य, उद्योगाचे ज्ञान आणि दृष्टीकोन यांतून भारतभरातील प्रत्येक रुग्णाला निदानाची दर्जेदार सेवा सुलभ रितीने आणि परवडणाऱ्या दरांत उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आणखी मजबूत होईल.”

आपल्या नवीन नेमणुकीबद्दल ‘कृष्णा डायग्नॉस्टिक्स’चे मुख्य कार्यान्वयीन अधिकारी डॉ. रविंदर सेठी म्हणाले, “सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात अग्रगण्य आणि दूरदर्शी मानल्या जाणाऱ्या ‘कृष्णा डायग्नॉस्टिक्स’मध्ये रुजू होताना मला आनंद होत आहे आणि या संधीबद्दल मी ऋणी आहे. या कंपनीच्या टीमसोबत काम करण्यास मी उत्सुकही आहे. भारतातील प्रत्येक रुग्णाला दर्जेदार आणि सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून देण्याचे कंपनीचे ध्येय व धोरण पुढे नेण्याचे मी आटोकाट प्रयत्न करीन.”

Leave a Reply

%d bloggers like this: