ताराचंद धर्मार्थ हॉस्पिटलमध्ये नवजात शिशू अतिदक्षता विभागाचे आधुनिकीकरण व विस्तारीकरण 

पुणे : पुणे शहरातील गरजू रुग्णांना अतिशय अल्प दरात आरोग्य सेवा पुरवणारे ताराचंद धर्मार्थ हॉस्पिटलमध्ये आता रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊन च्या मदतीमुळे नवजात शिशू अतिदक्षता विभागाचे आधुनिकरण व विस्तारीकरण झाले आहे . आता शहरातील व परिसरातील गरीब व गरजूंना अतिशय मोलाची मदत होणार असल्याचे मत रोटरी क्लब चे माजी गव्हर्नर डॉ. गिरीश गुणे यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. ताराचंद हॉस्पिटल च्या अतिदक्षता विभाग उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊन ने ग्लोबल ग्रँट प्रोजेक्ट अंतर्गत नुकतेच रास्ता पेठ येथील ताराचंद हॉस्पिटल मध्ये नवजात शिशु साठी आवश्यक अतिदक्षता विभागाचे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरण करण्याचा प्रकल्प नुकताच पूर्ण करण्यात आला.आता या प्रकल्पा मुळे या सुविधांचा लाभ मिळणाऱ्या नवजात शिशुची संख्या प्रति वर्षी 300 वरून 800 पर्यंत वाढणार आहे. या नवजात शिशु अतिदक्षता विभागात अत्यल्प म्हणजे खासगी हॉस्पिटल पेक्षा 70% स्वस्त दरात उपचार करण्यात येतात. अद्ययावत मशिन्स आणि अनुभवी व तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन यामुळे मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधा आणि उपचारात कोणतीही तडजोड केली जात नाही. या मुळे खर्चिक वैद्यकीय सुविधा ज्याना परवडत नाहीत अशा पालकांना ताराचंद हॉस्पिटल द्वारे मिळणारी ही सुविधा अत्यल्प दरात मिळू शकणार असल्याने ते एक मोठे वरदान ठरणार आहे.

या प्रकल्पाची किंमत अंदाजे रु. 54 लाख आहे. या प्रकल्पासाठी अमेरिकेतील बेथेलहेम क्लब व बरोबर इतर 2 क्लब , पुण्यातील इस्ट क्लब व साऊथ क्लब तसेच रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 , 7430, 6740, 6060 व वुई सर्व्ह फौंडेशन , अमेरिका यांनी देखील सहकार्य केले आहे. या प्रकल्पाचे हस्तांतरण आणि उद्घाटन सोहळा आज पार पडला . हा कार्यक्रम ताराचंद हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आलेला होता.

या प्रकल्पाची माहिती रो. सुबोध गुळवणी यांनी दिली. प्रास्ताविक रोटरी पुणेचे अध्यक्ष पराग सुरा यांनी केले. या प्रकल्पामध्ये अभिजित म्हसकर, राजकुमार तांबे , नितीन गद्रे व सुरेश शिंदे व सचिव सूरज पाषाणकर यांचाही सहभाग होता. ताराचंद हॉस्पिटल तर्फे प्रमुख विश्वस्त श्री गोपाल राठी यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: