श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग विरोधी समिती स्थापन


महाविद्यालय व आजूबाजूच्या परिसर रॅगिंगमुक्त ठेवण्याचा निर्धार ; पुर्नरचना केलेल्या समितीची बैठक

पुणे : न-हे येथील सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग विरोधी समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. पुर्नरचना केलेल्या नवनियुक्त समितीची बैठक नुकतीच पार पडली असून महाविद्यालय व आजूबाजूचा परिसर रॅगिंगमुक्त ठेवण्याचा निर्धार यामध्ये करण्यात आला.

समितीमध्ये संचालक डॉ.ए.व्ही.भोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कृष्णकांत पाटील, उपप्राचार्य डॉ.सचिनकुमार वानखेडे, नायब तहसीलदार निर्मला माकरे, पोलीस अधिकारी प्रशांत कणसे, पालक प्रतिनिधी डॉ.सुहास कलशेट्टी, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी म्हणून मैत्रयुवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.ए.व्ही.भोरे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

प्राचार्य डॉ.कृष्णकांत पाटील म्हणाले, कोविडनंतर पुन्हा एकदा महाविद्यालये नियमीतपणे सुरु होत आहेत. त्यामुळे नवीन प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांसह जुन्या विद्यार्थ्यांना देखील रॅगिंगमुक्त महाविद्यालयाचे वातावरण उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याकरीता वर्षभरात विविध प्रकारचे संवादात्मक कार्यक्रम, जनजागृती, चर्चासत्र असे विविध उपक्रम देखील राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: