शशिकांत किसन जफरे प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता

पुणे  :  भीमाशंकर जवळील पाबे येथील शशिकांत किसन जफरे प्रतिष्ठाणच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची सांगता ह.भ.प. फलके महाराजांच्या प्रवचनाने झाली.

याप्रसंगी भक्ती सांप्रदायातील अनेक मान्यवर विचारवंत उपस्थित होते. दरम्यान, निसर्गवासी शशिकांतभाऊ जफरे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्र राज्य वारकरी मंडळाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विजुआण्णा जगताप, उद्योगपती व वृक्षमित्र अरुण पवार, राष्ट्रवादी काँगेस अनुसूचीत जमाती सेलचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विष्णु शेळके, माजी नगरसेवक राजू लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सह्याद्री विकास प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष कृष्णाजी भालचिम, माजी अध्यक्ष नामदेव गभाले, ऍड. सुदाम मराडे, गुलाब हिले. डॉ. वामन गोणटे, राजेंद्र मराडे, ठींगिरे सह्याद्री ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष देवजी घोडे, निवृत्त ऑडीटर भिमाजी केंगले आदी उपस्थित होते.

 विजुआण्णा जगताप यांनी मंदिराच्या सभागृहासाठी अकरा हजार रुपयांची देणगी जाहीर करून सांगितले, की पंचक्रोशीतील गोरगरीब जनतेची लग्न साहळे, धार्मिक विधी, त्याच बरोबर वारकरी सांप्रदायाचे प्रशिक्षण, आदिवासी समाजाचे प्रबोधन, आदिवासीं क्रांतीकारक, थोर व्यक्ती यांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करण्यासाठी या सभागृहाचा उपयोग करता येईल. 
अरुण पवार यांनी सभागृहाच्या बांधकामासाठी एकावन्न हजार रुपयांची देगगी देण्याचे आश्वासन देत सांगितले, की गावातील ग्रामस्थांना प्रत्येक घरासमोर फळझाड आणि या मंदिरा सभोवताली चौफेर वृक्ष लागवड करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना हवी ती मदत करणार असल्याचेही अरुण पवार म्हणाले. 

विष्णु शेळके यांनी जफरे महाराजांच्या मार्गदर्शनात घडलो असून, त्यांच्यामुळेच समाजसेवेत आल्याचे सांगत या सभागृह उभारणीत आपला खारीचा वाटा असेल, असे आश्वासन दिले. तसेच भीमा तीरावरील ऐतिहासिक ठिकाण भविष्यात आदिवासी बांधवाचे क्रांतिस्थळ बनवू, हेच स्थान विविध विचारधारा व समाज प्रबोधनाचे उगमस्थान होऊन महाराष्ट्राला प्रेरणादायी नेतृत्व इथून घडतील, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
 किसन महाराज जाफरे म्हणाले, की येथे भव्य सभागृह, निवास व्यवस्था व स्वच्छतागृहाची उभारणी करण्याचा मनोदय आहे. आपण आम्हाला ग्रामीण भागात विकास साधण्यासाठी मदत करा. आम्ही पिंपरी चिंचवड शहरातील आदिवासी बांधव आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, याची ग्वाही देतो. ग्रामीण भागातील गोरगरीबाच्या सेवेसाठी प्रतिष्ठाणच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवित आहोत. 
     

Leave a Reply

%d bloggers like this: