लवकरच भेटीला येणार ‘समरेणू’ची प्रेमकहाणी

‘सुरवात महत्वाची नाय, शेवट महत्वाचाय…’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘समरेणू’ या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. एम आर फिल्म्स वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन महेश डोंगरे यांनी केले आहे. सूरज- धीरज यांचे संगीत असलेल्या या चित्रपटातील गाण्यांना गुरू ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांचे शब्द लाभले आहेत. तर या गाण्यांना कुणाल गांजावाला, निती मोहन, आदर्श शिंदे आणि अजय गोगावले अशा दमदार गायकांचा आवाज लाभला आहे. धमाकेदार संगीत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती एम आर फिल्म्स वर्ल्डची असून प्रमोद कवडे, बाळासाहेब बोरकर, बालाजी मोरे, युवराज शेलार सहनिर्माता आहेत. 

‘समरेणू’ या चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप समोर आली नसली तरी टिझरवरून ही एक प्रेमकहाणी असल्याचे दिसत आहे. सुरूवात महत्वाची नसलेल्या या प्रेमकहाणीचा शेवट काय असणार आहे, हे मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. ‘समरेणू’ १३ मे रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे.

https://bit.ly/SamrenuOfficialFirstTeaser 

Leave a Reply

%d bloggers like this: