हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आरोपींवर कायदेशीर कारवाई होणार – रूपाली चाकणकर


पुणे:एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना काल पुण्यात वडगाव येथे घडली होती. पीडित मुलीवर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज पीडितेची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. तिची प्रकृती ठीक असल्याची माहिती चाकणकर त्यांनी दिलीय. पीडित मुलीवर हल्ला करणाऱ्या तरुणाने देखील विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर देखील उपचार सुरू आहेत. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. अशी माहितीही रुपाली चाकणकर यांनी पत्रकारांना दिलीय.

रूपाली चाकणकर म्हणाल्या, हल्ला झालेली मुलगी दहावीची विद्यार्थिनी असून आजपासून तिची परीक्षा सुरू होत आहे. उपचार सुरू असताना तिला हॉस्पिटल मधून परीक्षा देण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे रूपाली चाकणकर म्हणाल्या.
रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यातील एका मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे . त्यावर पुण्यातील शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्याशी संबंधित प्रकरणातील तरुणी सुखरूप असल्याची या रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. पीडित मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी कुचीक  यांच्यावर गुन्हा दाखल आहे. दरम्यान पीडित मुलगी मानसिक तणावा खाली असून तिच्या जीवाला धोका असल्याचा दावा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर पीडित मुलीला न्याय मिळेल या दृष्टिकोनातून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले असल्याचा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
आज शाळा कॉलेज मध्ये हिजाब वापरण्यास मनाई करण्याबाबतचा निर्णय कर्नाटक हायकोर्टाने दिला आहे. तो निर्णय मान्य असल्याचं रुपाली चाकणकर यांनी म्हणाले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: