शाहरूख खान घेवून येत आहे नवा OTT प्लॅटफॉर्म

बॉलिवूड सुपरस्टार किंग खान शाहरूख खान गेल्या अनेक दिवस बीग स्क्रीन पासून लांब आहे. तसेच तो OTT वर कधी येणार ? याचीही सर्व प्रेक्षकांना उत्सुक्ता आहे. आज त्याने त्याच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. शाहरुख खानने लवकरच आपण ‘SRK +’हा नवीन OTT प्लॅटफॉर्म घेवून येणार असल्याचे ट्वीट केले आहे. यामध्ये शाहरूख खानने ‘कुछ कुछ होनेवाला है, अब् ओटीटी की दुनिया मे’ असे लिहीत एक फोटो शेयर केला आहे.

दरम्यान, वर्षभरापूर्वी शाहरुख खानने डिस्ने प्लस हॉटस्टारवर पदार्पण करणाऱ्या जाहीराती प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु त्यांचे पुढे काहीच झाले नाही. तर मधल्या काळात त्याचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे ही त्याचा हा प्रोजेक्ट पुढे ढकलालला गेला असल्याची चर्चा आहे. मात्र आता किंग खान ‘SRK +’हा नवीन OTT प्लॅटफॉर्म घेवून येणार हे नक्की. लवकरच या बाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

आज की पार्टी तेरी तराफ से 

शाहरुख खानने लवकरच आपण ‘SRK +’हा नवीन OTT प्लॅटफॉर्म घेवून येणार असल्याचे ट्वीट केले आहे. बॉलीवूड मधून किंग खानच्या या आगामी प्रोजेक्टचे स्वागत होत आहे. अनेक सिने तारकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘बॉलीवूडचा भाईजान’ सलमान खान याने देखील ट्वीट करीत शाहरूखच्या या OTT प्लॅटफॉर्मला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

 

 

 

Leave a Reply

%d bloggers like this: