‘वी’च्या ग्राहकांसाठी आता गेमिंगची सुविधा
टेलिकॉम सेवा पुरवणारी आघाडीची कंपनी वोडाफोन आयडिया लिमिटेडने भारतातील गेमिंग प्रेमींसाठी वी ऍपवर ‘वी गेम्स’ ही नवी सुविधा आज सुरु केली आहे. यामध्ये भारतातील विविध फ्रॅन्चायजीजच्या लोकप्रिय गेम टायटल्सचा समावेश आहे. यासाठी वी ने नजारान टेक्नॉलॉजीज लिमिटेड (बीएसई: 543280) (एनएसई: NAZARA) या भारतातील वैविध्यपूर्ण गेमिंग आणि स्पोर्ट्स मीडिया कंपनीसोबत भागीदारी केली आहे.
वी ऍपवर वी गेम्समध्ये अँड्रॉइड आणि एचटीएमएल५ वर आधारित १२०० पेक्षा जास्त मोबाईल गेम्स उपलब्ध आहेत. ऍक्शन, ऍडव्हेंचर, आर्केड, कॅज्युअल, शिक्षण, मौजमस्ती, कोडी, रेसिंग, खेळ आणि स्ट्रॅटेजी या १० अतिशय लोकप्रिय शैलींमधील गेम्स यामध्ये आहेत.
वोडाफोन आयडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अवनीश खोसला यांनी सांगितले, “भारतामध्ये गेमिंगचा उपभोग घेण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होत असल्याचे आमच्या निदर्शनास येत आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कन्टेन्टचा आनंद घेण्यासाठी ९५% पेक्षा जास्त गेमिंग प्रेमी मोबाईल डिव्हाईसचा वापर करतात. आमच्या वी ऍपवर वैशिष्ट्यपूर्ण, विशेष गेम्सची विशाल श्रेणी उपलब्ध करवून आम्ही आमच्या ग्राहकांना प्रदान करत असलेल्या गेमिंग अनुभवांमध्ये नजारा टेक्नॉलॉजीजसोबत आमच्या भागीदारीमुळे अधिक जास्त सुधारणा होतील.“
नजारा टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे संस्थापक व समूह व्यवस्थापकीय संचालक नितीश मीटरसेन यांनी सांगितले, “भारतामध्ये गेमिंग हे मनोरंजनाचे भवितव्य आहे. गेमिंग कन्टेन्ट, ईस्पोर्ट्स आणि संवादात्मक मनोरंजनाचा संपूर्ण पोर्टफोलिओ वीच्या युजर्सच्या प्रचंड मोठ्या संख्येला उपलब्ध करवून देण्यासाठी वी सोबत भागीदारी करताना नजाराला अतिशय आनंद होत आहे.”
‘वी’ ऍपवर वी गेम्समध्ये उपलब्ध असलेल्या गेमिंगचे एकूण ३ विभाग आहेत.
1. गोल्ड गेम्स हा कन्टेन्ट लायब्ररीचा सर्वात मोठा भाग असणार आहे. ३० गेम्स प्रस्तुत करणारा गोल्ड पास वापरून वी युजर्स हे गेम्स खेळू शकतात. पोस्टपेड ग्राहकांसाठी याची किंमत ५० रुपये व प्रीपेड ग्राहकांसाठी ५६ रुपये आहे. याची वैधता ३० दिवसांसाठी असणार आहे. ४९९ रुपये आणि पोस्टपेड युजर्सना दर महिन्याला ५ गोल्ड गेम्स निःशुल्क खेळता येतील.
2. प्लॅटिनम गेम्स हे पे पर डाउनलोड अर्थात दर डाउनलोडनुसार किंमत अदा करण्याच्या आधारावर उपलब्ध असणार आहेत. यासाठीच्या प्लॅटिनम पासची किंमत पोस्टपेड ग्राहकांसाठी २५ रुपये व प्रीपेड ग्राहकांसाठी २६ रुपये असणार आहे.
3. २५० पेक्षा जास्त निःशुल्क गेम्स