Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

पंजाब विजयाने ‘आप’मध्ये उत्साह, आपची पुण्यात रॅली

पुणे : पंजाब मधील अभूतपूर्व विजयाने ‘आप’च्या पुण्यातही उत्साहाचे वातावरण आहे. येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात आप युथ विंग च्या पुढाकाराने ‘निर्धार रॅली’ काढण्यात आली. यात आपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सामील झाले होते. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे संकेत यातून देण्यात आले.

कात्रज चौक येथून या रॅली ची सुरवात झाली. अहिल्यादेवी चौक – महेश सोसायटी चौक – बिबवेवाडी – गंगाधाम चौक – डायस प्लॉट – ७ लव्हस् चौक – स्वारगेट – तावरे कॉलनी – ट्रेझर पार्क – चव्हाण नगर अश्या मार्गे स्वामी विवेकानंद पुतळा सातारा रोड येथे सांगता झाली.

अजिंक्य शिंदे (अध्यक्ष – आप युवा आघाडी महाराष्ट्र), संदीप सोनावणे (अध्यक्ष – आप युवा आघाडी, पश्चिम महाराष्ट्र, उपाध्यक्ष – पुणे जिल्हा), महेश स्वामी (अध्यक्ष, आप युवा आघाडी, पुणे), नौशाद अन्सारी, अक्षय सुतार, प्रणित तावरे, सावन राऊत, आशुतोष शिपलकर, सागर फाटक, योगेश इंगळे, एस. एम. अली, सुभाष कारंडे, किशोर मुजुमदार, दत्तात्रय कदम, संदेश दिवेकर, अनिल कोंढाळकर, मोहनसिंग राजपुत, किरण कांबळे, सतीश यादव, तुषार कासार, विक्रम गायकवाड, श्रीकांत चांदणे, महेश गायकवाड, अनंत कुलकर्णी, आचार्य, कृष्णा गायकवाड, ललिता गायकवाड, संतोष पाटोळे, असगर बेग, मनोज थोरात आदी यात सामील झाले होते.

काल पुणे येथे परिवर्तन निर्धार रॅली व पिंपरी चिंचवड येथे स्वराज्य निर्धार कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला असे आप चे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading