सावित्री सन्मान फौंडेशन स्त्रीच हक्काच व्यासपीठ आयोजित महिला दिन साजरा
पुणे : सावित्री सन्मान फौंडेशन स्त्रीच हक्काच व्यासपीठ आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 125 व्या स्मृतिदिनानिमित्त व जागतिक महिला दिन विशेष कार्यक्रम ऐतिहासिक वास्तू, समता भूमी महात्मा फुले वाडा येथे आयोजित करण्यात आलेला होता.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, भा.ज.पा ओ.बी. सी. मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, महाराष्ट्र प्रदेश रंजना टिळेकर नगरसेविका योगेश बाप्पू ससाणे, नगरसेवक नीता होले (संस्थापक : अध्यक्ष महात्मा फुले सामाजिक संस्था गणेश झगडे संचालक :छ. स. सा.कारखाना, भवानी नगर तसेच इतर अनेक मान्यवरांच्या उपस्तिथीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी सावित्री बाईंच्या स्मृतीना उजाळा देण्यासाठी त्यांच्या जीवनपटावर आधारित एकपात्री प्रयोग तृप्ती वाव्हळ (टिळेकर ) यांचा ‘व्हय मी सावित्री’ आयोजित करण्यात आलेला होता. सावित्री सन्मान फौंडेशन कडून वर्षभरात फौंडेशन साठी ऑनलाईन कार्यक्रम घेऊन ज्या महिलांनी सहकार्य केले त्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. तसेच वोकेथॉन चॅलेंज मध्ये चांगली कामगिरी केलेल्या महिला सदस्यांचा सत्कार पण करण्यात आला. फौंडेशन मार्फत आलेल्या सर्व महिलांना ज्ञानज्योती सावित्री बाई फुले पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
