Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

स्वागतार्ह निर्णय : पुण्यातील वाहतूक, आरोग्य सेवेला अर्थसंकल्पात प्राधान्य – माजी आमदार मोहन जोशी

पुणे : पुण्याजवळ इंदायणी मेडिसिटीची उभारणी आणि रिंगरोडसाठी भरीव तरतूद करून आणि मेट्रो मार्गांना चालना देण्याचा संकल्प राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी केला असून .स्वागतार्ह निर्णय घेतले आहेत, अशी प्रतिक्रिया माजी आमदार, प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे.

इंद्रायणी मेडिसिटीसाठी ३०० एकर जागा उपलब्ध केली जाणार असून सर्वच उपचार एकाच ठिकाणी असलेली ही देशातील पहिली वसाहत असेल. अनेक रुग्णांना ही वसाहत दिलासा देईल असा विश्वास आहे, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.

पुण्यातील तीन मेट्रो मार्ग आणि विस्तारीत मार्गांच्या कामाला चालना देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. पुणे रिंगरोड प्रकल्पासाठी १ हजार ५०० कोटींची तरतूद केली आहे. पुण्याच्या वाहतूक प्रश्नाची सोडवणूक करण्याचा भरीव प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला आहे, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी २५० कोटींचा निधी दिला जाणार आहे.या तरतुदीतून भव्य आणि प्रेरणादायी स्मारक उभे राहील, असे मोहन जोशी यांनी म्हटले असून या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सीएनजीच्या दरात सवलत दिल्याने सीएनजीचा वापर करणारे वाहनचालक, आणि घरगुती ग्राहक यांना अर्थमंत्र्यांनी दिलासा दिला आहे. सध्याच्या महागाईच्या काळात अशा निर्णयाची गरज होती, असे मोहन जोशी यांनी नमूद केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading