नबाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही – चंद्रकांत पाटील

पुणे : नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा यासाठी अधिवेशनात भाजप आक्रमक दिसली. भाजपने देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली आजाद मैदानावर भव्य मोर्चा काढला. त्यावर येथील पुढील काळात देवेंद्र फडणवीस व भाजप आक्रमक राहणार असून. आम्ही नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी मंत्रालय पण चर्चा करणार असून. प्रत्येक मंत्र्याने कोणकोणते घोटाळे केले ते  आता आम्ही बाहेर काढणार असून. भाजप नबाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात दिला.

पुण्यात भाजपने महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे .अशी चर्चा आहे. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, ओबीसींना अजूनही सरकारने आरक्षण दिले नाही. महानगरपालिकांच्या निवडणुका या सहा महिने पुढे गेले आहेत. ओबीसींना आरक्षण हे भेटले पाहिजे. आम्ही निवडणुकीची तयारी चालू केली होती पण आता सगळ्या गुपित गोष्टी लक्षात ठेवून काम करावे लागणार आहे .असे चंद्रकांत पाटील म्हणाले,
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, खोटं बोलणारा डिशाईन अर्थसंकल्प आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात तीन वर्षापूर्वी पैसे जमा होणार होते. पण ते अजून काही झाले नाही. एसटीचे कर्मचाऱ्यांचे विलगीकरण अजून पूर्णपणे केले नाही.
सारथी व इतर मंडळांच्या प्रश्नांकडे या अर्थसंकल्पातून काहीच वाट्याला आलेले दिसत नाही. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

उत्तराखंड ,गोवा ,पंजाब, उत्तराखंड विधानसभा निवडणुकीमध्ये महा विकास आघाडी सरकारला स्पष्ट बहुमत मिळाले नाही .त्यामुळे आज वर्षा बंगल्यावर शरद पवार यांनी तातडीची बैठक बोलावली. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, शरद पवारांनी माझा रोज काही संपर्क होत नसतो. सावधगिरी म्हणून शरद पवारांनी बैठक बोलवली असेल. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: