Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

एक उत्कृष्ट अर्थसंकल्प जाहीर केल्याबद्दल अजित पवार यांचे अभिनंदन -प्रशांत जगताप

पुणे: आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आदरणीय अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पाचे मी पुणेकरांच्या वतीने मनःपूर्वक स्वागत करतो. एक सर्वसमावेशक अर्थसंकल्प दादांनी विधानसभेत सादर केला.संपूर्ण राज्याला अर्थसंकल्पातून न्याय देत असताना पुणे जिल्हा, पुणे शहराला एक मेट्रोपोलिटिअन सिटी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणून आवश्यक त्या सर्व गोष्टी देण्याचा अजितदादांनी प्रयत्न केल्याबद्दल मी समस्त पुणेकरांच्या वतीने त्यांचे शतशः आभार मानतो.

आज या बजेटमध्ये बहुचर्चित व बहुप्रतीक्षित अश्या पुण्याच्या रिंगरोड साठी तब्बल 1500 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. पुणे मेट्रोच्या बाबतीत सांगायचं झालं तर पुणे मेट्रो ही आदरणीय पवारसाहेब अजितदादांची पुण्याला दिलेली देण आहे.आज राज्यात महाविकास आघाडी सरकार असतानासुद्धा पुणे मेट्रो चे जाळे शहरभर पसरावे या हेतूने नव्या तीन मेट्रो मार्गांची घोषणा आजची दादांनी केली. स्वारगेट ते कात्रज, स्वारगेट ते हडपसर ,पिंपरी ते निगडी अश्या या तीन मेट्रो मार्गामुळे पुणे मेट्रोचे जाळे शहरभर पसरण्यास मदत होणार आहे. या मार्गासाठी निधीची तरतूद या बजेटमध्ये दादांनी केली आहे. त्याचप्रमाणे तब्बल तीनशे एकर परिसरात इंद्रायणी मेडिसिटी उभारली जाणार असून याचा फायदा पुणे शहर ,जिल्हा, पिंपरी चिंचवड ला होणार आहे. ज्या फुले दाम्पत्याने खर्‍या अर्थाने स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्या फुले दांपत्याच्या स्मृती जतन करण्यासाठी भिडेवाडा या त्यांच्या ऐतिहासिक वास्तूला तब्बल शंभर कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून आपण पुणे नाशिक रेल्वे महामार्ग बद्दल चर्चा ऐकतोय आज अजितदादांनी अर्थसंकल्प या रेल्वेमार्गाचा तब्बल 80 टक्के खर्च राज्य सरकार करणार असल्याचे सांगितले व या रेल्वेसाठी आपण केंद्र सरकारवर ते अवलंबून नाहीत हे अधोरेखित केले. पुणे जिल्ह्यात हेरीटेज वॉक असेल, रुग्ण रुग्णालयांमध्ये टेलीमेडिसीन हब असेल या माध्यमातून पुणेकरांचे आरोग्य निकोप राहील याची देखील काळजी घेतलेली आहे. या संपूर्ण अर्थ संकल्पामध्ये पुणे शहर व जिल्ह्याला सर्व बाबींमध्ये योग्य न्याय दिल्याबद्दल मी आदरणीय अजित पवार यांचे मी आभार मानतो व संपूर्ण राज्यासाठी एक उत्कृष्ट अर्थसंकल्प जाहीर केल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading