देशभरात पाच हजार दलित महिला उद्योजक निर्माण करणार – पद्मश्री मिलिंद कांबळे

पुणे : देशभरात दलीत इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि भारत सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून देशभरात येत्या वर्षात पाच हजार दलीत महिला उद्योजक निर्माण करणार असल्याचा संकल्प आय आय एम जम्मू चे चेअरमन व दलीत इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्री चे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी आज व्यक्त केला . डिक्की च्या वतीने आज हॉटेल लेमन ट्री येथील सभागृहात महिला दिनानिमत्त उत्कृष्ठ महीला उद्योजक पुरस्कार व महिला साठी उद्योग व्यवसाय मार्गदर्शन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले की देशभरात आम्ही संस्थेचे वतीने विविध योजना राबवित आहोत .सद्ध्या भारत सरकार मुद्रा योजना ,स्टँड अप योजना ,यासारख्या अनेक योजना नवीन उद्योजक तयार होण्यासाठी राबवित आहे .म्हणून आमच्या संस्थेच्या माध्यमातून दलीत ,उपेक्षित समाजातील महिलांना आर्थिक दृष्टया सक्षम बनविण्यासाठी संपूर्ण देशभर नवीन महिला उद्योजकांना मदत आणि उभारणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविणार असल्याचे पद्मश्री मिलिंद कांबळे यावेळी म्हणाले .
महिलांनी उद्योग व्यवसायात प्रामुख्याने आल्या पाहिजे त्यामुळे भारत देशाची एक नवी ओळख निर्माण होईल व देश प्रगतीच्या शिखरावर जाईल असे मत आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या भारत सरकारच्या msme विभागाच्या मुख्य संयुक्त सचिव अलका अरोरा म्हणाल्या.त्यांनी आपल्या मनोगतात भारत सरकारच्या अनेक योजनांची माहिती उपस्थित महिलांना दिली .या कार्यक्रमात अरोरा यांच्या हस्ते यशस्वी महिला उद्योजकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षा सीमा कांबळे होत्या .या कार्यक्रमात दलीत इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री चे राष्ट्रीय अध्यक्ष रविकुमार नररा यांनीही मार्गदर्शन केले.यावेळी या कार्यक्रमास अनिल होवाळे अध्यक्ष पुणे डिक्की,अविनाश जगताप ,संजीव डांगी ,प्राजक्ता गायकवाड ,निवेदिता कांबळे,संतोष कांबळे यासह डिक्की च्या महीला विंग च्या पदाधिकारी व उद्योजिका मोठ्या प्रमाणत उपस्थित होत्या .

Leave a Reply

%d bloggers like this: