राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने तक्रार दाखल
पुणे:महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कार्यरत असलेले भगतसिंग कोश्यारी यांनी जाहीर कार्यक्रमात विविध प्रसार माध्यमांसमोर अखंड भारताचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह व आमचे भावनांना ठेच लागेल असे जाणीवपूर्वक विधान केले आहे,त्यांचे सदर भाषण सर्व मराठी प्रसार माध्यमांतून प्रसारीत होऊन तशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांनी संत रामदास नहीं होते तो शिवाजी को कौन पाहचानता, संत रामदास शिवाजी के गुरू थे” असे वक्तव्य करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत जनतेच्या भावना दुखावल्या आहेत.
याबाबत मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोरील, क्रिमीनल अर्ज क्र.995/2008 मध्ये दिनांक 16 जुलै 2018 रोजी मा. न्यायालयाने सुस्पष्ट निकाल दिला असतांना छत्रपती शिवाजी महाराज यांना कमी लेखण्याचा व त्यांचे महान कर्तृत्व नाकारण्याचा प्रयत्न केला आहे, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला आहे, आणि हे वक्तव्य करण्याच्या आधी सावित्रीबाई फुले व महात्मा जोतीराव फुले या महापुरुषां बद्दल बोलतानाही अतिशय खालच्या आणि पत्रात उल्लेख करायला लाज वाटेल असे वक्तव्य राज्यपालांनी केले आहे, आणि हे सांस्कृतिक आणि विद्येचे माहेर घर असणाऱ्या पुणे शहराला शोभणारे नाही,भगतसिंग कोश्यारी यांनी अक्षम्य गुन्हा केला आहे. वास्तविक भारतीय संविधान व सर्व कायदे देशातील सर्वांना एकसमान पद्धतीने लागू आहेत.
राज्याच्या महत्वाच्या स्थानी कार्यरत असलेले मा.भगतसिंग कोश्यारी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करून गुन्हा केला आहे. आम्ही राज्यपाल पदाचा पुर्ण आदर व सन्मान ठेवत आहोत मात्र वैयक्तीकरित्या भगतसिंग कोश्यारी यांच्यावर तक्रार नोंदवण्यासाठी विनंती करत आहोत.जर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व भगतसिंग कोश्यारी यांचा पुणे जिल्ह्यात एकही कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी दिला आहे,
यावेळी,जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे,हवेली तालुकाध्यक्ष शिवाजी पवार,जिल्हा सचिव निलेश ढगे,विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष जयदीप रणदिवे, विजय कदम, उपस्थित होते.
