SRA योजनांचा FSI वाढवल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांचे आभार -प्रशांत जगताप
पुणे : पुणे शहरातील एसआरए मधील नवीन गृह प्रकल्पांना अतिरिक्त एफएसआय वाढवून मिळावा याबाबतचे निवेदन मागील तीन दिवसापूर्वी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आज तात्काळ हा विषय मार्गी लावला असून राज्याच्या गृहनिर्माण विभागाने आज याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
पुणे शहर हे भौगोलिकदृष्टया राज्यातील १ क्रमांकाचे शहर आहे. या शहराच्या एकुण लोकसंख्येपैकी तब्बल ४२ टक्के लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये राहते. तसेच या शहरात एकूण ५४२ झोपडपट्टया आहेत. सध्या पुणे शहरात सुरू असलेले एसआरए प्रकल्पांमधील झोपडपट्टी वासीयांना मिळणारी २७० चौ. फुटची घरे अपुरी ठरतात, या निर्णयामुळे या सर्व नागरिकांना दिलासा मिळणारअसून इथून पुढे सुरू होणाऱ्या एसआरए प्रकल्पांमध्ये किमान ३०० चौ. फुटाची घरे देण्याबाबतचा आदेश राज्याच्या गृहनिर्माण विभागाने काढला आहे. शहरातील तब्बल ५४२ झोपडट्टीवासीयांना दिलासा देणाऱ्या या निर्णयाबद्दल पालकमंत्री अजित पवार यांचे मी आभार मानतो असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले.
