कन्या पूजनाने साजरा केला महिला दिन

पुणे : जागतिक महिला दिनानिमित्त शहरात विविध उपक्रमांद्वारे महिलांना केंद्र बिंदू ठेवून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु नऱ्हे येथे आयोजित करण्यात आलेल्या अनोख्या कार्यक्रमाची चर्चा आज सर्वत्र पहायला मिळाली. नऱ्हे येथील संकल्प एज्युकेशन सोसायटीच्या संकल्प प्रशालेच्या वतीने २५ मुलींचे ‘कन्या पूजन’ करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी कौतुक केले आहे.

हा समारंभाचे आयोजन संकल्प प्रशाला येथे करण्यात आले होते. यावेळी संकल्प एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा राधिका गिरमे, संचालक निलेश गिरमे, मुख्याध्यापिका सुप्रिया बढे यांच्यासह शिक्षिका शांती जावळकर, अल्मस तांबोळी, राम तोरकडी, प्रदीप कणसे, लोकेश राठोड, वैभव थोपटे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी संकल्प एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा राधिका गिरमे म्हणाल्या की, स्त्री ही माता, भगिनी, पत्नी अशा विविध रुपात आपले कर्तव्याचे पालन करत असते. कन्येच्या रुपात असणारी स्त्री सक्षम, बलशाली व्हावी याच उद्देशाने आजच्या दिवशी कन्या पूजन करताना या मुलींना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: