सौंदर्य क्षेत्रात काम करणार्याा महिलांचा सन्मान सोहळा…
पुणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मेसाई प्रतिष्ठानच्या वतीने ब्युटी क्षेत्रात कार्यरत असणार्या. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभरात विविध शहरांतील महिलांसाठी विशेष स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बेस्ट मेकअप टीचर आणि बेस्ट मेकअप अकॅडमी या स्पर्धेमधील विजेत्या स्पर्धाकांचा बक्षीस वितरण सोहळा स्वारगेट परिसरातील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स पदमजी हॉल येथे हा सोहळा पार पडला.
यावेळी मेसाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय तळोले, उपाध्यक्ष सोनाली तळोले, खजिनदार आश्विनी लोले, पप्पू तळोले, सोमनाथ काशिद, रविंद्र घोसाळकर, नरेश कुलकर्णी, संतोष पांदे, सुहास जाधव उपस्थित होते.
बेस्ट मेकअप टीचर अवॉर्ड विजेते – वैशाली साळुंखे (तासगाव, सांगली), मनिषा जखोटीया (कल्याण, ठाणे), शीला जगताप (फलटण, सातारा), तारा बनकर (जालना), बेस्ट ब्युटी टीचर पुरस्कार – सपना खाडे(रायगड), बेस्ट ब्युटी अकॅडमी पुरस्कार – सौंदर्या ब्युटी अकॅडमी (पारनेर, अहमदनगर)
विजय तळोले म्हणाले की, कोरोनाकाळात सातत्याने सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय बंद राहत होता. त्यामुळे हातावर पोट असणारे बंधू –भगिनींवर उपासमारीची वेळ आली होती. उत्पन्नाचे इतर कोणतेही साधन उपलब्ध नसल्यामुळे तसेच कोरोनाच्या भितीमुळे ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे गेले काही वर्ष या भगिनी हवालदील झाल्या होत्या. त्यामुळे मेसाई प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.